Amruta Khanvilkar : 'वैयक्तिक आयुष्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांना आता थेट ...'; अमृता खानविलकरच्या 'या' निर्णयाची सर्वत्र चर्चा

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आहे. तिच्याबद्दल विविध प्रकारच्या अफवा आणि दावे सोशल मीडियावर पसरत असल्याचे समोर आल्यानंतर अमृताने आता याविरोधात कायदेशीर पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे.


अमृता (Amruta Khanvilkar) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती आपल्या कामासोबतच विविध ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. मात्र, आता काही पोस्ट आणि मजकुरांवर अमृताने आक्षेप घेतला आहे.



‘असत्य आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करू नका’ :


अमृताने (Amruta Khanvilkar) तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘अधिकृत कायदेशीर निवेदन’ शेअर केले आहे. हे निवेदन 10 ऑगस्ट 2026 पासून लागू असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनानुसार, अमृता खानविलकर यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य, निराधार, बदनामीकारक किंवा गोपनीयतेचा भंग करणारा मजकूर ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमांवर प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.



अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा :


निवेदनात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीची बदनामी करणारी माहिती, अफवा किंवा खोटी माहिती तयार करणे, प्रसारित करणे किंवा शेअर करणे आढळल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. अमृताच्या कायदेशीर टीमकडून हे निवेदन सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. मात्र, कोणत्या विशिष्ट पोस्ट किंवा व्यक्तींविरोधात कारवाई केली जाणार आहे, याबाबत निवेदनात स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. (Amruta Khanvilkar)



चाहत्यांकडून अमृताच्या निर्णयाचे कौतुक :


अमृताने (Amruta Khanvilkar) घेतलेल्या या भूमिकेचे तिचे चाहते कौतुक करत आहेत. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबाबत सोशल मीडियावर कोणतीही माहिती पडताळणी न करता पसरवली जाते. अशा परिस्थितीत अफवा आणि खोट्या माहितीविरोधात अमृताने घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. आता अमृताच्या या कायदेशीर इशाऱ्यानंतर तिच्याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना कितपत आळा बसतो आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Amruta Khanvilkar)


Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या