Toxic Trailer : रणबीर कपूरचा 'ॲनिमल' लूक कॉपी केला? 'टॉक्सिक'मधील यशच्या वादग्रस्त लूक; सोशल मीडियावर तुफान ट्रोलिंग

मुंबई : साऊथ सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ (Toxic Trailer) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, दमदार अॅक्शन आणि आकर्षक व्हिज्युअल्समुळे त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ट्रेलरमधील यशच्या एका लूकची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली आहे.


ट्रेलरमध्ये यश एका शर्टलेस अंदाजात दिसतो. त्याचा हा लूक पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्याची तुलना रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटातील लूकशी केली आहे. काही चाहत्यांनी दोन्ही अभिनेत्यांचे शर्टलेस सीन्स असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. (Hindi Cinema)



यशच्या या लूकवरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही युजर्सनी यशने ‘ॲनिमल’मधील रणबीरच्या लूकपासून प्रेरणा घेतली असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी थेट दोन्ही चित्रपटांच्या लूकमध्ये साम्य असल्याची चर्चा केली आहे. दुसरीकडे, यशच्या चाहत्यांनी मात्र त्याच्या लूकचे कौतुक केले आहे. त्यामुळे ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ‘टॉक्सिक’मधील हा सीन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.(Entertainment News)


‘टॉक्सिक’चे लेखन आणि दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अॅक्शन-थ्रिलर प्रकारातील या चित्रपटाची घोषणा 2023 मध्ये करण्यात आली होती. 2024 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली.


‘टॉक्सिक’ हा कन्नड आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आला आहे. चित्रपटातील अॅक्शन, कलाकारांचे लूक आणि भव्य दृश्यांमुळे प्रदर्शनापूर्वीच त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Bollywood News)


Comments
Add Comment

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या

Rakshabandhan : रक्षाबंधनाचं आयकॉनिक गाणं ‘फुलों का तारों का’ खरं तर राखीसाठी बनलंच नव्हतं! जाणून घ्या खास किस्सा

मुंबई : रक्षाबंधन म्हटलं की भावाबहीणीच्या नात्याची आठवण करून देणारं एक गाणं हमखास कानावर पडतं. ‘फुलों का तारों

Bandhu Marathi Film : ‘बंधू’ चित्रपटातून अभिनेता रजत बेदीची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; म्हणाला, "कथानकाने माझं लक्ष्य वेधलं"

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi) आता 'बंधू' या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीचा विस्तार आणखी