CM Devendra Fadnavis : भारताला थांबवण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परकीय शक्तींना 'भारत छोडो' म्हणण्याची वेळ



मुंबई : "काही परकीय शक्ती भारताच्या प्रगतीचा वेग पाहून घाबरल्या असून आपल्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबूड करून देशाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हातात तिरंगा घेऊन बाहेर पडलेल्या या अथांग युवाशक्तीला रोखण्याची आणि भारताला महासत्ता होण्यापासून थांबवण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी हाती माईक घेत 'दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये' हे देशभक्तीपर गीत गायल्याने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह संचारला. (CM Devendra Fadnavis)


वरळी येथे आयोजित या भव्य तिरंगा रॅलीला मुंबईकरांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. हातात डौलाने फडकरणारा राष्ट्रध्वज आणि 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण वरळीचा परिसर दुमदुमून गेला होता.(Vande Mataram)



उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला आज इथे दोन महासागर पाहायला मिळत आहेत. समोर एकीकडे अथांग हिंद महासागर आहे आणि दुसरीकडे माझ्यासमोर हा जनसागराचा 'तिरंगा महासागर' उसळलेला दिसतो आहे. ज्या तिरंग्याची आन-बान-शान राखण्यासाठी आमचे क्रांतिकारक फासावर चढले आणि सीमेवर जवानांनी आपले प्राण पणाला लावले, त्यांच्याच बलिदानामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी हा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकला. जोपर्यंत जगात चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत हा तिरंगा कधीही खाली येणार नाही." (Tiranga)


आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे. आयटी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आज जगातील बलाढ्य देशांशी बरोबरीने मुकाबला करत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असून, जगभरात जे कोणालाही जमले नाही ते आज आपल्या देशाने करून दाखवले आहे. सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला भारत हा जगातील सर्वांत ऊर्जावान देश बनला आहे, असेही त्यांनी सांगितले.(CM Devendra Fadnavis)



परकीय शक्तींना 'भारत छोडो' म्हणण्याची वेळ


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत जगात क्रमांक एकची महासत्ता बनेल अशी भीती काही आंतरराष्ट्रीय शक्तींना वाटत आहे. म्हणूनच ते भारताच्या अंतर्गत मामल्यांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ही भारतमाता आता थांबणारी नाही. २०४७ पर्यंत पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली 'विकसित भारत'ची संकल्पना प्रत्यक्षात आलेली पाहायला मिळेल. ९ ऑगस्ट १९४२ ची क्रांती ही ब्रिटिशांविरुद्धची 'भारत छोडो' चळवळ होती. आजची नवभारताची क्रांती ही 'करो या मरो' आणि 'विकसित भारत' घडवण्याची आहे. त्यामुळे आता देशाच्या विकासात खोडा घालणाऱ्या भारतविरोधी आणि परकीय शक्तींनाच 'भारत छोडो' म्हणायची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला. (CM Devendra Fadnavis)



मुख्यमंत्र्यांनी गायले देशभक्तीपर गीत


भाषणापूर्वी 'दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये' हे प्रसिद्ध गाणे सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अचानक हातात माईक घेतला आणि संगीताच्या तालावर हे गाणे गाण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांचा हा अंदाज पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली. त्यांच्या या गीतगायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात तो विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून

Eknath Shinde : दहा वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक

Snakebite In Gadchiroli : गडचिरोलीत सर्पदंशामुळे ३ मुलींचा मृत्यू, ३ मुलींना एअरसिफ्ट करून रुग्णालयात केले दाखल

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानीत आश्रमशाळेत रात्री गाढ झोपलेल्या सहा मुलींना सर्पदंश