Nashik : नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ( Simhastha Kumbh Mela ) कामांच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचे रॅकेट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाचा आणि ‘एस’ अक्षराच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून हुबेहूब बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार करण्यात आले. या बनावट आदेशांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या फसवणुकीचा आकडा तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा मोठा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी सोमवारी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केला.
Moto Pad 70 Launch : लेनोवोच्या मालकीच्या मोटोरोला ब्रँडने भारतात आपला नवीन Moto Pad 70 टॅब्लेट लॉन्च केला आहे. मोठा 2.5K डिस्प्ले, 10,200mAh क्षमतेची बॅटरी, 68W फास्ट चार्जिंग आणि AI ...
५०० ते ६०० कोटींचे फेक वर्क ऑर्डर
कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या पोलिसांना जेवण, पिण्याचे पाणी, चटया, बादल्या, चादरी आणि इतर साहित्य पुरविण्याच्या नावाखाली हे बनावट कार्यारंभ आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका कार्यारंभ आदेशाची रक्कम तब्बल १०० ते १५० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या कामांसाठी शासनाकडून अधिकृत ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबवली जाते. मात्र, या प्रकरणात ज्यांना वर्क ऑर्डर देण्यात आले, त्यांनी संबंधित कामांसाठी कोणतीही ऑनलाइन निविदा भरलेली नव्हती. तरीही संशयितांकडून संबंधित व्यक्तींकडून रोख रक्कम आणि धनादेशाच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आले आणि त्यांना ऑफलाइन कार्यारंभ आदेश देण्यात आले.
Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहराजवळील मुकुंदनगर परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यावर जमावाने केलेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली ...
बनावट आदेश हुबेहूब अधिकृत कागदपत्रांसारखे
विशेष म्हणजे, हे बनावट आदेश शासनाच्या अधिकृत कागदपत्रांसारखेच हुबेहूब तयार करण्यात आले होते. त्यामुळे अनेक जण या फसवणुकीला बळी पडल्याचे समोर आले आहे. अधिकृत कार्यारंभ आदेशावर सामान्यतः क्यूआर कोड असतो. तसेच महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव अशा पद्धतीने नमूद केले जात नाही. मात्र, बनावट आदेशांमध्ये त्यांचे नाव आणि केवळ ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी वापरण्यात आल्याचे आढळले आहे. चार ते पाच जणांनी आपल्याकडे येऊन हे बनावट कार्यारंभ आदेश दाखवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
Nashik Crime News : नाशिकच्या पर्यटनाला टवाळखोरांची नजर लागल्याचं चित्र आहे. भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्रकार आजही ...
या प्रकरणाची गंभीर दखल
सध्या त्यांच्याकडे चार बनावट आदेश असल्याची माहितीही त्यांनी दिली. हे आदेश मार्च आणि एप्रिल महिन्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील दोन आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा संशयितांमध्ये समावेश असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्याचे महाजन यांनी सांगितले.
Nashik Crime : नाशिकमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी शहरात आलेल्या एका विद्यार्थिनीसोबत एका तरुणाने गैरकृत्य केल्याचं समोर आलं आहे. १७ वर्षीय ...
...तर नागरिकांनी पोलिसांत तक्रार दाखल करावी
दरम्यान, बनावट आदेश तयार करताना शासनाच्या अधिकृत कागदपत्रांची हुबेहूब नक्कल करण्यात आल्याने या प्रकरणात विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जाणार आहे. तसेच, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. तक्रारींच्या आधारे या संपूर्ण रॅकेटचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.






