Shalarth ID Scam : नाशिकच्या गुजर हायस्कूलमध्ये गोलमाल, ११ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल ; नेमके प्रकरण काय ?

Shalarth ID Scam : नाशिकच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवून देणारा बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास वेगाने सुरु आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेले अनेक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे. अशातच देवळाली कॅम्प (Deolali Camp) भागातील नामांकित डॉ. सुभाष गुजर हायस्कूलमध्ये बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून वेतन निश्चिती करत संस्था आणि शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत तब्बल ११ शिक्षकांविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात (Deolali Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



शैक्षणिक वर्तुळात खळबळ


शंकर एज्युकेशन सोसायटीचे  (Shankar Education Society)सचिव रतन राजलदास चावला यांनी याबाबात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, डॉ. सुभाष गुजर हायस्कूल (Dr. Subhash Gujar High School) (सिलेक्शन कॉर्नर, पेट्रोलपंपासमोर, देवळाली कॅम्प) येथे सन २००१ ते २५ मार्च २०२२ या कालावधीत हा गैरप्रकार घडला असून संबंधित ११ संशयितांनी संस्थेमध्ये वेतन निश्चितीसाठी जिल्हा परिषद नाशिक तसेच नाशिकच्या शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्याकडे कोणताही अधिकृत पत्रव्यवहार अथवा मान्यता ठराव सादर केलेला नव्हता. संशयितांनी परस्पर खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून वेतन निश्चिती पदरात पाडून घेतली. असे फिर्यादीत नमूद आहे.



​गुन्हा दाखल झालेले ११ संशयित शिक्षक


​१) प्रज्ञा नितीन राजे (रा. शांती प्रसाद, हॉस्पिटलजवळ, नाशिक रोड)


२) पूनम समीर मुखर्जी (रा. हिरामय हाउस देवळाली कॅम्प)


३) प्रियंका विजय आहुजा (रा. संजय सोसायटी, लॅम रोड, विहितगाव)


४) लक्ष्मण यशवंत मुसळे (रा. भैरवनाथ नगर, संसरी गाव, नाशिक)


५) कु. विश्वंभरी पंजूमल दौलतानी (रा. साई समर्थ एन्क्लेव्ह, एसबीआय बँकेच्यामागे, देवळाली कॅम्प)


६) शरयू प्रकाश कुलकर्णी (रा. आशर इस्टेट, उपनगर, नाशिक)


७) कु. सविता अर्जुनसिंग अडवाणी (रा. स्पेरींग टाईम मेडो, हरीकिशन नगर, देवळाली कॅम्प)


८) भाग्यश्री संजय हिरे (रा. तुळसी बी, श्रीकृष्ण नगर, बिटको कॉलेजच्यामागे, नाशिक रोड)


९) मनमोहन श्याम हेमनानी (रा. हौसेन रोड, नाशिक)


१०) शोभा तानाजी ढुमणे (रा. सुपर रेसीडन्सी, माणेकशा नगर, द्वारका, नाशिक)


११) सुजाता श्रीकृष्ण ठाकूर (रा. १०२३, जैन व्हिला, देवळाली कॅम्प)


रतन राजलदास चावला फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलिसांनी (Deolali Camp Police Station) फसवणुकीसह गुन्हेगारी कटाचा गुन्हा नोंदवला आहे. उपनिरीक्षक पाडेकर तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे

India-Chile CEPA : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना वेग; वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी चिलीच्या उपमंत्री पॉला एस्तेव्हेझ वाइनस्टीन यांची घेतली भेट

नवी दिल्ली : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना पुढे नेण्यासाठी वाणिज्य सचिव राजेश

पंतप्रधान मोदी १३७ व्या 'मन की बात'मधून कोणत्या विषयांवर काय बोलले ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ३० ऑगस्ट २०२६ रोजी १३७ व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला