पंतप्रधान मोदी १३७ व्या 'मन की बात'मधून कोणत्या विषयांवर काय बोलले ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ३० ऑगस्ट २०२६ रोजी १३७ व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. मोदी विदेश दौऱ्यावर असल्यामुळे यावेळी कार्यक्रम आधीच ध्वनीमुद्रीत (प्री रेकॉर्डेड प्रोग्रॅम) केला होता. यंदाच्या 'मन की बात' कार्यक्रमातून मोदींनी व्यसनमुक्ती मोहिमेसह सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर भाष्य केले. त्यांनी 'भारत छोडो' आंदोलनासह स्वातंत्र्य लढ्याचाही उल्लेख केला.


https://www.prahaar.in/2026/08/30/indian-standard-time-to-be-mandatory-across-the-country-from-march-2027/


कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी मुंबईचे कृष्णा शेषाद्री चालवत असलेल्या 'भारतराज्य.कॉम' या वेबसाइटचा उल्लेख केला. या वेबसाइटवर तुम्ही कोणतेही वर्ष निवडून त्या वेळी भारताच्या कोणत्या भागावर कोणाचे राज्य होते, हे पाहू शकता. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी कृष्णा शेषाद्री यांच्याशी फोनवर संवादही साधला. तसेच पंतप्रधानांनी त्यांना ही कल्पना कुठून सुचली, असेही विचारले. पंतप्रधानांनी कृष्णा शेषाद्री यांचे कौतुक केले.


https://www.prahaar.in/2026/08/30/indias-fourth-aircraft-arrived-in-nepal-with-11-tonnes-of-relief-material/


व्यसनमुक्ती मोहिमेचाही पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख केला. देशातील तरुण व्यसनमुक्ती मोहिमेचा भाग बनत आहेत. ही चांगली बाब असल्याचे मोदी म्हणाले. अमली पदार्थांच्या व्यसनाचा परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे व्यसनाच्या विळख्यातून देशातील तरुण पिढी बाहेर पडणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी तरुणांना घोषणा, गाणी आणि नाटकांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.


https://www.prahaar.in/2026/08/30/prime-minister-modi-conferred-uzbekistans-highest-honor-oliy-darajali-dostlik/


स्वातंत्र्य दिन, राष्ट्रीय हातमाग दिन आणि भारत छोडो आंदोलनाचा वर्धापन दिन यांसारखे प्रसंग देशवासियांमध्ये अभिमानाची भावना जागृत करतात, असे सांगत पंतप्रधान मोदींनी वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनाचाही उल्लेख केला आणि सांगितले की, वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनामुळे हे वर्ष अधिकच विशेष झाले आहे. त्यांनी सांगितले की, 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत आतापर्यंत ८ कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आले आहेत. त्यांनी सूर्यपथ तिरंगा अभियानाचाही उल्लेख केला.


https://www.prahaar.in/2026/08/30/kyiv-ukraine-weapons-depot-explosion-drone-attack-on-weapons-depot-near-kyiv-37-killed-and-42-injured-in-massive-explosion/


पीएम स्वनिधी योजनेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी या योजनेने महिलांना कसे सक्षम केले आहे हे सांगितले. पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी ४६ टक्के महिला आहेत. त्यांनी गाझियाबादच्या बबिता शर्मा यांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, त्या पूजेचे साहित्य विकायच्या, पण पीएम स्वनिधी योजनेमुळे त्यांना मदत मिळाली आणि आता त्यांच्या स्टॉलचे दुकानात रूपांतर झाले आहे.


https://www.prahaar.in/2026/08/30/us-shooting-shooting-in-a-us-park-two-people-including-the-suspect-and-a-police-officer-killed-another-officer-injured/


पंतप्रधानांनी अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि सार्वजनिक सहभागाबद्दल भाष्य केले. त्यांनी प्रसिद्ध अभिनेते उत्तम कुमार यांच्या जन्मशताब्दीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, उत्तम कुमार यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि लोकांच्या मनात आपले स्थान कायमचे कोरले आहे. सणांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी 'व्होकल फॉर लोकल'चा अवलंब करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. त्यांनी कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्सना 'व्होकल फॉर लोकल'ला चा अवलंब करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. त्यांनी कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्सना 'व्होकल फॉर लोकल'ला प्रोत्साहन देण्याचे आणि इतरांनाही असे करण्याचे आवाहन केले.

Comments
Add Comment

India-Chile CEPA : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना वेग; वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी चिलीच्या उपमंत्री पॉला एस्तेव्हेझ वाइनस्टीन यांची घेतली भेट

नवी दिल्ली : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना पुढे नेण्यासाठी वाणिज्य सचिव राजेश

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता