Sindhudurg Global Industrial Region : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन प्रकल्पाला गती; उद्योग, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीवर भर

मुंबई : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन (SGIR) प्रकल्पाच्या विकासासाठी कृती आराखड्याला वेग देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाची संकल्पना, विकास आराखडा आणि पुढील अंमलबजावणीच्या टप्प्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ( Sindhudurg Global Industrial Region)


बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या. तसेच प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक पथकातील अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. (Nitesh Rane)



बैठकीत सिंधुदुर्गमध्ये औद्योगिक विकासासोबतच पर्यटन, शिक्षण आणि सामाजिक सुविधांचा समतोल राखणारी आधुनिक विकास व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात आला. औद्योगिक क्षेत्रासोबत आवश्यक सामाजिक आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा निर्माण करून संपूर्ण विकासाची परिसंस्था उभी करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सादरीकरणात देण्यात आली. (Sindhudurg News)


उपलब्ध नैसर्गिक आणि औद्योगिक संसाधनांचा प्रभावी वापर करून विविध उद्योगांना चालना देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर आधुनिक उत्पादन क्षेत्र विकसित करणे, तसेच 'युथ सिटी' संकल्पनेअंतर्गत शिक्षण, क्रीडा, पर्यटन आणि आधुनिक नागरी सुविधा

">विकसित करण्यावरही भर देण्यात आला. (Maharashtra Government)



प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया, विविध विभागांमधील समन्वय आणि पुढील टप्प्यातील कार्यवाहीबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. ( Industrial Development)


यावेळी नितेश राणे यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. उद्योग, पर्यटन आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा समन्वित विकास करून सिंधुदुर्गला शाश्वत आर्थिक विकासाचे नवे केंद्र बनविण्याच्या दिशेने नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाणार आहे. (Marathi News)




Tags
tourismnitesh raneemploymentinvestmentmaharashtra governmentindustrial developmentMaharashtra newsSindhudurg newsSindhudurg Global Industrial RegionSGIR
Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग