Sunday, August 9, 2026

Hawkers' QR code Identity cards : फेरीवाल्यांच्या क्यू आर कोड ओळखपत्रासाठी पावणे दोन कोटींचा खर्च

Hawkers' QR code Identity cards : फेरीवाल्यांच्या क्यू आर कोड ओळखपत्रासाठी पावणे दोन कोटींचा खर्च

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना न्यायालयाच्या निर्देशानुसार क्यू आर कोड आधारीत ओळख पत्र देण्याची कार्यवाही सुरु आहे. मात्र, फेरीवाल्यांसाठी ही ओळखपत्रे बनवण्यासाठी तब्बल पावणे दोन कोटींचा खर्च होणार आहे. महापालिकेच्यावतीने आतापर्यंत ५५ हजार फेरीवाल्यांना क्यू आर कोड ओळखपत्रे देण्यात येणार असून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत ही संपूर्ण कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. (Hawkers' QR code Identity cards)

मुंबईतील फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईनंतर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पेटला गेला. याप्रकरणात फेरीवाल्यांच्या काही संघटना न्यायालयात गेल्यानंतर यावर सुनावणी करताना न्यायालयाने निर्देश देत ज्यांची मुंबई महापालिका हद्दीतील सर्वेक्षणात नोंद झाली आहे, अशा एकूण ९९, ४३५ फेरीवाल्यांना क्यू आर कोडसहित ओळखपत्र देण्यास महापालिकेला सांगितले. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी तातडीने करण्याासाठी तात्काळ दरपत्रक मागवून फेरीवाल्यांना क्यू आर कोड ओळखपत्र देण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. (Hawkers' QR code Identity cards)

या एका ओळखपत्रासाठी १६८ रुपये मोजले जात असून ९९ हजार ४३५ ओळखपत्रासाठी १ कोटी ६७ लाख ०५ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी डॅक्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Hawkers' QR code Identity cards)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >