मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल झाला असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 9 ते 11 ऑगस्टदरम्यान राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट :
रविवार 9 ऑगस्ट रोजी काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Monsoon Update)
मालवण : एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. अनेकांना वाटतं की एआय हे बड्या उद्योगांमध्ये, मोठ्या कारखान्यांमध्ये, महाकाय ...
मुंबईत कसे राहणार हवामान?
मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, आकाश साधारणपणे ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबईचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)
रविवार 9 ऑगस्ट : विभागवार हवामान अंदाज
- कोकण : बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. - मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. - मराठवाडा : काही ठिकाणी पाऊस. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. - विदर्भ : काही ठिकाणी पाऊस. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. (Maharashtra Monsoon Update)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागातील कीटकनाशक विभागातील कामगार पांडुरंग तोडकर (वय ४५) यांचा नायगाव बीडीडी चाळीत ...
सोमवार 10 ऑगस्ट : पावसाची स्थिती
- कोकण : बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. - मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. - मराठवाडा : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. - विदर्भ : काही ठिकाणी पाऊस. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. (Maharashtra Monsoon Update)
शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन :
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. आता पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने अनेक भागांत सरींचा जोर वाढू शकतो. विशेषतः विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी पिके आणि शेतीमालाचे नुकसान होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. (Maharashtra Monsoon Update)





