Mumbai Mandai News : मुंबईतील मंड्यांच्या पुनर्विकासासाठी धोरणात्मक घेणार निर्णय

स्थायी समितीच्यावतीने होणार विशेष बैठक


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक मंडईंचा पुनर्विकास रखडलेला असून या मंंड्यांचा विकास त्वरीत व्हावा यासाठी महापालिका स्थायी समितीने पुढाकार घेतला आहे. या मंड्यांच्या पुनर्विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच स्थायी समितीची बैठक घेवून सदस्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाला या मंड्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून दादर सावरकर मंडईच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ( Mumbai Market Redevelopment)



मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये चार आठवड्यापूर्वी दादर पश्चिम येथील सावरकर मंडईच्या दुरुस्तीचा प्रस्ताव आला असता याची पाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी सावरकर मंडईची पाहणी केल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मंजूर केला.या प्रस्तावावर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी याचा पुनर्विकास करणे आवश्यक असले तरी क्रांतीसिंह नाना पाटील मंडईच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आल्याने या पर्यायी व्यवस्था नसल्याने सावरकर मंडईची दुरुस्ती केली जावी तसेच जी काही व्यतिरिक्त कामे सूचवली आहेत त्याचा स्वतंत्र प्रस्ताव सादर केला जावा अशी सूचना केली. यावर सर्वच सदस्यांनी आपली बाजू मांडत सूचना केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी २० मंड्यांच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव होते.त्या मंडईंच्या पुनर्विकासाचे काय झाले. या पुनर्विकासाअभावी वाहनतळ सुविधा, शीतगृह या सुविधा कार्यान्वित नाही. त्यामुळे हा दृष्टीकोन ठेवण्यात यायला हवा होता. परंतु आज सर्व मंडईंची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे या मंडईंच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. मार्केटचे आरक्षण विकसित व्हायला हवे. पण या मार्केटचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून नगरसेवकांच्या सूचनांचा विचार करत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक विशेष बैठक घेण्यात येणार आहे. माझगाव वालपाखाडी मार्केटच्या पुनर्विकासानंतर याच्या धोरणाचा विचार झाला होता. परंतु त्यानंतर कोणताही अमुलाग्र बदल झालेला नाही. त्यामुळे मंडईंचा विकास करून त्याचा कमर्शियल वापर कसा करता येईल, कोणत्या संस्था पुढे येवू शकतील याचा विचार या विशेष बैठकीत केला जाईल आणि सभागृहनेते गणेश खणकर यांनी सूचना केल्याप्रमाणे या मार्केटच्या विकासासाठी सल्लागाराची नेमणूक करून त्यातून महापालिकेला कसा जास्त महसूल मिळेल याचा विचारही केला जावू शकतो असे प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. ( Mumbai Mandai News)


यावेळी झालेल्या चर्चेत यशवंत किल्लेदार यांच्यासह श्रध्दा जाधव, डॉ सईदा खान, अश्रफ आझमी, तुलिफ मिरांडा, प्रकाश दरेकर, मिनाक्षी पाटणकर, शीतल गंभीर, गणेश खणकर, अमेय घोले, शैलेश फणसे आदींनी भाग घेत मंडईंची दुरवस्था आणि रखडलेला पुनर्विकास यावर आपल्या सूचना केल्या. ( Urban Development)

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)