Nashik News : एमएनजीएलची गॅस पाइपलाइन फुटून आगीचा भडका; परिसरात भीतीचे वातावरण

Nashik News : नाशिकच्या म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवर (Mhasrul-Makhmalabad Link Road) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवरील कनसरा माता चौकात (Kansara Mata Chowk) बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भुयारी गटाराचे खोदकाम सुरू असताना ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ची (Maharashtra Natural Gas Limited) मुख्य गॅस पाइपलाइन फुटल्याची घटना घडली आहे.


पाइपलाइन फुटल्यानंतर काहीच वेळात आगीचा मोठा भडका उडाल्याने वर्दळीच्या या रस्त्यावर वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अग्निशामक दलाने दाखवलेली तत्परता आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रसंगावधानामुळे याठिकाणी मोठी दुर्घटना टळली आहे.



नेमकं काय घडलं ?


पंचवटी विभागात (Panchvati Division) रस्ते काँक्रिटीकरण, ड्रेनेज लाईन, स्मार्ट सिटी आणि युटिलिटीची विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवरील साई संदेश चौकाजवळ रस्त्याच्या कामाला अडथळा ठरणार्‍या भुयारी गटाराच्या चेंबरचे खोदकाम सुरू होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हे काम सुरू असताना एमएनजीएलची पाइपलाइन अचानक गळती होऊन फुटली.


गॅस (Gas) लिकेज झाल्यानंतर पुढील एक तासाच्या अंतराने अचानक हवेत आगीचा प्रचंड भडका उडाला. स्थानिकांनी तत्परता दाखवत याबाबत पंचवटी अग्निशामक केंद्राला माहिती दिली. त्यानंतर प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे, फायरमन गणेश रकीबे, सिद्धार्थ गोतीस, संकेत वैष्णव व वाहनचालक अशोक सरोदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर वेळेत नियंत्रण मिळवले. मात्र अचानक हवेत अशाप्रकारे आगीच्या ज्वाळा पसरल्याने वर्दळीच्या या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे