Nashik Crime : कॉलेज रोडवर मद्यधुंद तरुणाचा पोलिसांवर हल्ला, नाइटलाईफ वादाच्या भोवऱ्यात

Nashik Crime : नाशिकच्या कॉलेज रोड (College Road) परिसरात पुन्हा एकदा मध्यरात्रीचा गोंधळ समोर आला आहे. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद तरुणाने रस्त्यावर धिंगाणा घालत गस्तीवर असलेल्या पोलिसांवरच हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कॉलेज रोडवरील नाइटलाईफ, अनधिकृत पार्ट्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


सोमवारी (दि. ३) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने रस्त्यावर जोरदार राडा घालत गस्तीवर असलेल्या पोलिसांवरच हल्ला चढवून धक्काबुक्की केली. रोहित विनायक आढाव (वय २८, रा. आढाव मळा, गुरुदत्तनगर, जेलरोड, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. गंगापूर पोलिसांचे (Gangapur Police) ‘डीबी मोबाईल’ पथक सोमवारी पहाटेच्या सुमारास परिसरात गस्त करत असताना डिसूझा कॉलनीतील (D'Souza Colony) एका मद्य दुकानाबाहेर त्यांना मोठी गर्दी दिसून आली.



मी पोलिसांना घाबरत नाही


घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना रोहित विनायक आढाव हा तरुण मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करताना आढळला. पोलिसांनी त्याला रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितले. मात्र, त्याने मी पोलिसांना घाबरत नाही, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही,असे ओरडत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने अंमलदार घन:श्याम प्रकाश भोये आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.



गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा


परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बळाचा वापर केला आणि संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. संबंधित तरुणाने जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय तपासणीत अतिमद्यसेवन केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या प्रकरणी रोहित विनायक आढाव याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांशी धक्काबुक्की करणे आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सरप्राइज चेकिंग मोहीम राबवा


दरम्यान, कॉलेज रोड परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पार्ट्या, मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा आणि वाढता गोंधळ यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. यापूर्वीही या भागात पोलिसांनी कारवाया केल्या असल्या तरी त्या अपुऱ्या ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे आता गंगापूर पोलिसांनी या परिसरात नियमित गस्त वाढवावी, रात्री उशिरापर्यंत उघड्या राहणाऱ्या आस्थापनांवर थेट गुन्हे दाखल करावेत आणि सरप्राइज चेकिंग मोहीम राबवावी, अशी मागणी त्रस्त रहिवाशांनी केली आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :

Chandrakant Patil : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांत मराठी भाषा विभाग अनिवार्य; NEPच्या प्रभावी अंमलबजावणीचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी