Nashik Rain Update : अहिल्यानगरमध्ये ११२% पाऊस, तर नाशिकमध्ये....; नाशिक विभागातील जिल्ह्यांची स्थिती काय ?

Nashik Rain Update :गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने धुव्वादार बॅटिंग केली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील नदी नाले भरले असून धरणे ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यात एकीकडे मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली असली तरी काही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. नाशिक विभागात सर्वाधिक पावसासाठी इगतपुरी तालुका ओळखला जातो. या तालुक्यात १,७३६ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ ५० टक्के पाऊस झाला आहे.




तर अहिल्यानगर( Ahilyanagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सरासरी २६६ मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल २०२ टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सरासरी ४४३ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ ३७ टक्के पाऊस झाला आहे. तर संगमनेर तालुक्यात १७१ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत १२३ टक्के पाऊस झाला आहे. नाशिक (Nashik) विभागात १ जून ते ३ ऑगस्टदरम्यान ३७७.३ मिलीमीटर सरासरीच्या तुलनेत ३६८.० मिलीमीटर, म्हणजेच ९७.५ टक्के पाऊस झाला आहे. तर जून महिन्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. जुलैमध्ये मात्र पावसाने ही कसर चांगलीच भरून काढली.

नाशिक विभागातील जिल्ह्यांची स्थिती काय ?


नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ५३१.३ मिलीमीटर (१०४.४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात २४०.३ मिलीमीटर (१११.८ टक्के), धुळे जिल्ह्यात ३४५.७ मिलीमीटर (११३.२ टक्के) आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात ३८९.५ मिलीमीटर (११७.४ टक्के) पाऊस झाला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मात्र आतापर्यंत २६३.७ मिलीमीटर (५४.३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.



१० तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस


नाशिक विभागातील ५४ तालुक्यांपैकी ३४ तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १२, जळगाव जिल्ह्यातील १०, अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ आणि धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे. विभागातील १० तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान पाऊस झाला.


यामध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, यावल, जामनेर, बोदवड आणि जळगाव, नाशिक जिल्ह्यातील पेठ व येवला, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता व नेवासा तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याचा समावेश आहे. उर्वरित १० तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. विभागात सर्वात कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा (३७.१ टक्के), अक्राणी (४०.८ टक्के), नंदुरबार (४६.९ टक्के), शहादा (४७.६ टक्के) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (४८.२ टक्के) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिक विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची भरती

Nashik : आदिवासी विकास विभागांतर्गत (Department of Tribal Development) कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला

Justice Sunil Shukre : न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांनी मंगळवारी राज्याच्या

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान आणि शाळांमधील कथित गैरप्रकारांवरून महाराष्ट्रातील

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Panvel ATM Fraud : पनवेलमध्ये ATM फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; कार्डची अदलाबदल करून ५० हजार रुपये लंपास

पनवेल : पनवेल शहरात ATM फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचं