Dhule Crime : सकारात्मक अहवालासाठी ४० हजारांची लाच, पोलीस उपनिरीक्षकासह शिपाई एसीबीच्या जाळ्यात

Dhule Crime : कुंपणच शेत खात असेल तर दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न सध्या वाढत्या लाचखोरीच्या प्रकरणांने सर्वसामान्य जनतेला पडत आहे. धुळे जिल्ह्यात असाच एक कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) पथकाने एका पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायास रंगेहात पकडले आहे. ( Dhule Crime News )



नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात (West Devpur Police Station) कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भानुदास तळेकर (Sainath Bhanudas Talekar) आणि पोलीस शिपाई अविनाश अरविंद सादरे (Avinash Arvind Sadre) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयात सकारात्मक अहवाल सादर करण्यासाठी सुरुवातीला ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत या दोघांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ( Dhule Crime News )



सकारात्मक अहवालासाठी ५० हजार


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या सासऱ्यांच्या नावावर धुळे तालुक्यातील वलवाडी येथे घर आहे. या घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून धुळे येथील एका दाम्पत्याने सन २०१५ मध्ये एका वित्त कंपनीकडून परस्पर ३६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज घेतल्याचा आरोप आहे. आणि या प्रकरणात तक्रारदाराच्या सासऱ्यांनी धुळे न्यायालयात (Dhule Court) फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता. या अर्जावर संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनी ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. ( Dhule Crime News )



पोलीस उपनिरीक्षकासह शिपाई रंगेहाथ ताब्यात


एक जागरूक नागरिक असल्याने आणि लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तीनऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याची खात्री झाली. त्यानंतर तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चार ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस शिपाई अविनाश सादरे यांनी तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनाही ताब्यात घेण्यात आले. ( Dhule Crime News )



पुढील तपास सुरु


या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Comments
Add Comment

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत

Weight Loss Tips : व्यायामाशिवाय वजन कमी करायचंय? मग आहारात ‘या’ पदार्थांचा नक्की करा समावेश

मुंबई : वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकांना नियमित

Parenting Tips : मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायचा आहे? फोन हिसकावण्याऐवजी हे उपाय करा

आजकाल लहान मुलांचा मोबाईल, टॅब्लेट आणि टीव्हीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कार्टून पाहत जेवणे, गेम

Jaiswal, Fernando : आयसीसीची यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोवर दंडात्मक कारवाई

कोलंबो : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या झटापटीनंतर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि

INDvsSL : श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीवर भारताची मजबूत पकड

कोलंबो : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपले स्थान मजबूत केले आहे. देवदत्त पडिक्कलच्या शतकानंतर

Thane : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

ठाणे : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ