एकता कपूर : एकता कपूरचा सलमान खानला सडेतोड टोला ? म्हणाली- "जेव्हा तुमचा प्रतिस्पर्धी प्रत्येक भागात..."

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) यांच्यात सोशल मीडियावर एक अप्रत्यक्ष युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. 'अलायन्स' या शोच्या प्रमोशन रम्यान सलमान खानने केलेल्या एका वक्तव्याने चांगलाच गदारोळ माजवला होता. आता त्यावर एकता कपूरने सोशल मीडियावर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्याला नेटकरी सलमान खानला दिलेले 'सडेतोड प्रत्युत्तर' मानत आहेत.



एकता कपूरची ती इन्स्टाग्राम स्टोरी आणि नेटकर्‍यांचे तर्क!



एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक अत्यंत आत्मविश्वासू आणि पॉवरफुल फोटो शेअर करत लिहिले, "जेव्हा तुमचा कॉम्पिटिशन एखाद्या वेड्या एक्सप्रमाणे प्रत्येक एपिसोडमध्ये तुमचाच उल्लेख करतो..." एकता कपूरने जरी यात कोणाचेही नाव थेट घेतले नसले, तरी तिची ही पोस्ट सलमान खानच्या त्या विधानानंतरच आल्याने बॉलिवूड आणि सोशल मीडियावर गॉसिप्सचा बाजार प्रचंड तापला आहे.



सलमान खान नेमकं काय म्हणाला होता ?


हे संपूर्ण प्रकरण तेव्हा सुरू झाले जेव्हा सलमान खान त्याचा भाऊ सोहेल खानच्या 'अलायन्स' या नव्या रिअॅलिटी शोच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. तिथे बोलताना सलमानने गंमतीने म्हटले होते की, "मला वाटतंय आता रितेश देशमुखची नोकरी धोक्यात आहे." सलमान खानच्या या विधानानंतर तो लवकरच रिअॅलिटी शो 'लॉकअप'मध्ये रितेश देशमुख आणि फराह खान यांना रिप्लेस करणार की काय? अशा चर्चांना उधाण आले होते.



'लॉकअप-२' आणि 'अलायन्स' मधील टक्कर!


सध्या ओटीटीवर एकता कपूरचा 'लॉकअप-२' हा शो प्रचंड चर्चेत आहे आणि सोहेल खानचा 'अलायन्स' शो त्याला थेट टक्कर देण्यासाठी आणला गेला आहे. त्यामुळे चाहते या दोन्ही शोजची तुलना करत आहेत. सलमान खानच्या विधानावर रितेश देशमुख किंवा फराह खानने कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नसली, तरी एकता कपूरच्या या रोखठोक पोस्टने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, एकता कपूर आणि सलमान खान हे एकमेकांचे चांगले मित्र मानले जातात आणि एकता अनेकदा सलमानच्या 'बिग बॉस' शोमध्ये पाहुणी म्हणूनही गेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर सलमान खान काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या