Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'ची तारीख ठरली! सलमान खानची 'करण-अर्जुन' शैलीत एंट्री; कुठे आणि कधीपासून पाहायला मिळणार शो?

मुंबई : सर्वात लोकप्रिय आणि चर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस' (Bigg Boss) आपल्या २० व्या वर्षात पदार्पण करत असून, या ऐतिहासिक सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मेकर्सनी अखेर चाहत्यांची उत्सुकता ताणून न धरता 'बिग बॉस २०'ची (Bigg Boss Season 2) रिलीज डेट जाहीर केली आहे. याचसोबत शोचा पहिलावहिला धडाकेबाज प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे, ज्याने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.



सलमान खानची 'करण-अर्जुन' शैलीत एंट्री अन् अनाकलनीय ट्विस्ट!


समोर आलेल्या प्रोमोमध्ये बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान त्याच्या सुपरहिट 'करण-अर्जुन' सिनेमातील गाजलेल्या लूकमध्ये दिसत आहे. घोड्यावर स्वार होऊन एका दमदार शैलीत एंट्री घेत सलमान खान म्हणतो, "जो करण अर्जुन में हुआ, वो दोबारा होगा... तथास्तु!" सलमान खानच्या या एकाच वाक्याने चाहत्यांच्या धडधडी वाढवल्या असून शोमध्ये नेमका काय नवा ट्विस्ट असणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. या सीझनबद्दल बोलताना सलमान म्हणाला, "बिग बॉसचा प्रत्येक सीझन नवं गणित घेऊन येतो, पण यंदाचा सीझन आतापर्यंतचा सर्वात वेगळा असेल. प्रोमो हा केवळ पहिला संकेत आहे, तो दोनदा काळजीपूर्वक बघा... कारण अजून खूप काही समोर यायचं बाकी आहे!"



कधी अन् कुठे पाहायला मिळणार 'बिग बॉस २०'?




'बिग बॉस २०'चा भव्य प्रीमिअर ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. प्रेक्षकांना हा शो दोन वेगवेगळ्या माध्यमांवर पाहता येणार आहे: ओटीटी (OTT): जिओहॉटस्टारवर (JioHotstar) रात्री ९:०० वाजता स्ट्रीम होईल. टेलिव्हिजन (TV): कलर्स टीव्हीवर (Colors TV) रात्री १०:३० वाजता प्रसारित केला जाईल.



६ भाषा आणि सौरव गांगुलीचे महापदार्पण!


यंदाच्या 'बिग बॉस'चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय टीव्हीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच महिन्यात ७ भाषांमध्ये ७ सीझन सुरू होणार आहेत. यातील ६ प्रमुख भाषांचे सूत्रसंचालन दिग्गज कलाकार करणार आहेत:


हिंदी: सलमान खान


तमिळ: विजय सेतुपती


तेलुगू: नागार्जुन


कन्नड: किच्चा सुदीप


मल्याळम: मोहनलाल


बंगाली: भारताचा माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली बंगाली बिग बॉसचे सूत्रसंचालक म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे.



'हे' सेलिब्रिटी बनणार घराचे पाहुणे? 


यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या संभाव्य स्पर्धकांची यादीही समोर येत आहे. मेकर्सनी अनेक प्रसिद्ध टीव्ही कलाकार आणि सोशल मीडिया स्टार्सशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. यामध्ये, जन्नत जुबैर, उर्फी जावेद, फैसल शेख (मिस्टर फैसू), अंजली अरोरा, कुशल तंवर (गुल्लू), रुरू ठाकूर, सैंटी शर्मा आणि रिधिमा गुप्ता (रेधिमा) या सर्व लोकप्रिय नावांची सध्या जोरदार चर्चा असली, तरी मेकर्सकडून अधिकृत स्पर्धकांची यादी अजून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ६ सप्टेंबरला 'बिग बॉस'च्या घरात नक्की कोण प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी

National Teacher Award 2026 : उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

नवी दिल्ली : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या