Shalarth ID Scam : १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी शेंदुर्णी संस्थेचे पदाधिकारीही रडारवर

Shalarth ID Scam : राज्य शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक झालेल्या 'शालार्थ आयडी' घोटाळ्याच्या तपासाला आता अधिक वेग आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला संस्थेचा सहसचिव दीपक गरुड (Deepak Garud) याला नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने (Nashik Road Court) साेमवारी न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली असून गरुडच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे झाले आहेत.



इतर शिलेदारांवरही अटकेची टांगती तलवार


त्यामुळे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे (Shendurni Education Society) इतरही पदाधिकारी आणि कर्मचारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. इतर पदाधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचाही या गैरव्यवहारात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले झाल्याने येत्या काही दिवसांत या घोटाळ्यात सहभागी असलेल्या शेंदुर्णी संस्थेच्या इतर शिलेदारांवरही अटकेची टांगती तलवार असणार आहे.



दीपक गरुडची कारागृहात रवानगी


२७ जुलैला रात्री सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरुड (६७) यांना सापळा रचून बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर २९ जुलैच्या रात्री त्यांचा चुलत भाऊ आणि संस्थेचा सहसचिव दीपक गरुड (६५) याला बिजासणी घाटातून ताब्यात घेण्यात आले हाेते. शनिवारी न्यायालयाने संजय गरुड यास न्यायालयीन कोठडी सुनावली असली, तरी प्रकृतीचे कारण पुढे करत तो अजूनही नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik District Government Hospital) उपचार घेत आहे. तर दुसरीकडे, सहसचिव दीपक गरुडची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) रवानगी करण्यात आली आहे. दारम्यान, बोगस शालार्थ आयडीच्या जोरावर शासकीय तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या इतरही शिक्षण संस्थाचालकांचे या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.



मनपाची ८४४ कोटींची थकबाकी


दरम्यान, नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) कर सवलत योजना राबवूनही शहरातील घरपट्टी आणि पाणीपट्टीची (Property tax and water charges) तब्बल ८४४ कोटी रुपयांची थकबाकी अद्याप कायम आहे. विशेष म्हणजे ही थकीत रक्कम मनपाच्या वार्षिक अंदाजपत्रकाच्या (Municipal Corporation's annual budget) तब्बल २५ टक्के इतकी आहे. चालू मागणी आणि मागील थकबाकी मिळून एकूण ९७४ कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान समोर असताना, कर संकलन विभागाला (Tax Collection Department) आतापर्यंत अवघे १३१ कोटी रुपयेच वसूल करण्यात यश आले आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर लवकरच जप्ती आणि कडक कायदेशीर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे. कर विभागातील १२३ कर्मचाऱ्यांना मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामात गुंतवण्यात आले आहे. थकबाकीदारांवर जप्ती आणि दंडात्मक कारवायांची भीती दाखवून वसुलीचा वेग वाढवला जातो; मात्र कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे सध्या कडक कारवाई करणे शक्य झालेले नाही. याचा मोठा फटका पालिकेच्या वसुली मोहिमेला बसला आहे.

Comments
Add Comment

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Nanded Loha Child Case Pocso : नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) लोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Tarun Tejpal : शरण या, तुरुंगात जा आणि शिक्षा भोगायला सुरुवात करा; नंतर...

नवी दिल्ली :  'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्कार प्रकरणी

Nashik Simhastha Kumbhmela : ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’, २८ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; प्रवेश विनामूल्य

Nashik Simhastha Kumbhmela : नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांसाठी ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ची भक्ती आणि