Nashik Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमास आजन्म सश्रम कारावास

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील ​सटाणा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेनं संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी सटाणा तालुक्यातील शरद दादाजी पवार यास मालेगाव येथील विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाने जन्मठेप, आजीवन सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली आहे. (Nashik Crime News)



​नेमकं प्रकरण काय ?


​सटाणा तालुक्यातील एका खेडेगावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपी शरद पवार याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. धक्कादायक म्हणजे वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले होते. मुलगी अविवाहित आणि अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी याबाबत तात्काळ पोलिसांना कळवले. ​यानंतर पीडितेच्या आईने तिला जायखेडा पोलीस ठाण्यात नेऊन आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली होती. मात्र घडलेला प्रकार कोणालाही सांगू नकोस अन्यथा जीवे ठार मारेल अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली होती. (Nashik Crime News)



जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा


या प्रकरणी ऑक्टोबर २०२० मध्ये जायखेडा पोलीस ठाण्यात (Jaykheda Police Station) गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे आणि तपासी अंमलदार श्रीकृष्ण पारधी यांनी सखोल तपास करून मालेगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ​सदर खटला मालेगाव न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ सरकारी वकील संजय सोनवणे यांनी जोरदार युक्तिवाद करत एकूण ६ साक्षीदार तपासले.(Nashik Crime News)



नराधमास जन्मठेप


​सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि सबळ पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी शरद पवार यास जन्मठेप, ‘​पोक्सो’ ॲक्ट कलम ६ अन्वये नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत आजीवन सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंड तसेच भादंवि कलम ५०६ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५,००० रुपये दंड,अशी शिक्षा ठोठावली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी