Devendra Fadnavis : मुंबई पालिकेतील 'इनोव्हा'च्या प्रस्तावावरून मुख्यमंत्र्यांनी केली कानउघाडणी

उधळपट्टीवर नाराजी; जनतेचा पैसा विकासकामांवरच खर्च करण्याचे निर्देश


मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी 'स्कॉर्पिओ'ऐवजी महागड्या 'इनोव्हा' गाड्या उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील सत्ताधारी नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. जनतेच्या पैशांची कुठेही उधळपट्टी करू नका, हा पैसा विकासकामांवरच खर्च झाला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.


मुंबई महापालिकेच्या कामकाजावर सूक्ष्म लक्ष ठेवून असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील वाहनांच्या या प्रस्तावासंदर्भात नुकतेच वरिष्ठ पातळीवर ब्रीफिंग घेतले. त्या वेळी पालिकेतील उधळपट्टीच्या वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना जनतेप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ज्यांनी २५ वर्षे महापालिकेच्या सत्तेचा दुरुपयोग केला, त्यांना बाजूला सारून जनतेने आपल्याला संधी दिली आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी पालिकेचा निधी हा नागरी सुविधा आणि विकासकामांवरच केंद्रित झाला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.



दुसऱ्या बाजूला, महापालिकेतील वाहनांच्या या वादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. उपमहापौर, वैधानिक तसेच विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी प्रशासनाने भाडेतत्त्वावर स्कॉर्पिओ गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, या गाड्यांमध्ये प्रवासादरम्यान पाठ दुखत असल्याच्या तक्रारी विरोधी पक्षाच्या नेत्यांनीच केल्या होत्या, असा दावा सभागृह नेते गणेश खणकर यांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवरूनच स्कॉर्पिओ ऐवजी इनोव्हा गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव समोर आणला गेला. परंतु, आता विरोधकच यावरून राजकारण करत असल्याचा आरोप खणकर यांनी केला आहे.



वाहनांमध्ये एकसारखेपणा असावा :


या पुढे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची कोणतीही मागणी तोंडी न घेता लेखी स्वरूपातच घेतली जाईल, असे सांगतानाच गणेश खणकर यांनी महापौर आणि महापालिका आयुक्त वगळता अन्य सर्व अध्यक्ष व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांमध्ये एकसारखेपणा असावा, अशी भूमिका मांडली. आपण स्वत: अत्यंत आवश्यक असेल तरच पालिकेच्या वाहनाचा वापर करतो आणि बहुतांश वेळा लोकल ट्रेन किंवा दुचाकीनेच प्रवास करतो, असा दावाही खणकर यांनी या वेळी केला.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी