Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) मोठे पाऊल उचलले आहे. पुढील दोन महिन्यांत शहरभर सुमारे १,५०० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) कार्यान्वित होणार असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी अत्याधुनिक निगराणी यंत्रणा उभारली जात आहे.सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत विविध विकासकामांचा आढावा घेताना महापालिका आयुक्त मनीषा खत्री (Municipal Commissioner Manisha Khatri) यांनी ही माहिती दिली.
- विशेष तपासणी करून कारवाई होणार; वाहतूक विभागाचे राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र मुंबई : आपल्या खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे ...
३,३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन
आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले की, एकात्मिक निगराणी प्रणालीअंतर्गत शहरात एकूण ३,३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने कुंभमेळ्यापूर्वीच गर्दी व्यवस्थापनासाठी (Crowd Management) तयार करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीची (SOP) चाचणी घेता येणार असून, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आधीच दूर करता येतील. ही यंत्रणा शहरातील गर्दीची हालचाल, वाहतुकीची स्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेवर रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला तातडीने प्रतिसाद देणे आणि विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधणे अधिक सोपे होणार आहे.(Simhastha Kumbh Mela 2027)
मुंबई: गोल्ड लोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. कंपनीच्या जून तिमाहीतील अपेक्षेपेक्षा कमकुवत ...
सीसीटीव्ही कॅमेरे कुठे ?
नाशिक महापालिकेकडून शाही मार्ग, साधुग्राम, रामकुंड आणि गोदाघाटाकडे जाणारे प्रमुख रस्ते, शहरातील प्रवेशद्वारे, पार्किंग क्षेत्रे तसेच महत्त्वाचे चौक येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र ऑप्टिकल फायबर नेटवर्क उभारण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे २६५ किलोमीटर फायबर नेटवर्कचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांसोबत टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जात आहे.(Simhastha Kumbh Mela 2027)
यावेळी आयुक्तांनी कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या रस्ते, पूल, पाणीपुरवठा (Water Supply) , सांडपाणी व जलनिस्सारण व्यवस्था (Drainage system) , मलनिस्सारण प्रकल्प (Sewage treatment plant) , अग्निसुरक्षा आणि आरोग्य सुविधांच्या कामांचाही आढावा घेतला. गंगापूर फाटा, आंबड, राजीव गांधी मार्ग, त्र्यंबक रोड आणि सातपूर या प्रमुख मार्गांवरील कामे नियोजनानुसार सुरू असून, ऑगस्टअखेरपर्यंत त्यातील बहुतांश कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (Simhastha Kumbh Mela 2027)
Nashik : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहे. धरणं देखील ओसांडून ...
प्रत्येक प्रकल्पाचे स्वतंत्र वेळापत्रक निश्चित
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळा २०२७पूर्वी सर्व विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रत्येक प्रकल्पाचे स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, महापालिका नियमितपणे त्यावर देखरेख ठेवत आहे,असे आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले.





