Prashant Kishor : प्रशांत किशोर यांचा बांकीपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजय

बांकीपूर : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या पोटनिवडणुकीत जन सुराज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत किशोर यांचा विजय झाला आहे. भाजपचे नीरज कुमार या पोटनिवडणुकीत सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. प्रशांत किशोर यांना ६४ हजार १५१ मते मिळाली तर नीरज कुमार यांना ४४ हजार ८२७ मते मिळाली. पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा १९ हजार ३२४ मतांनी विजय झाला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या रेखा कुमारी यांना पोटनिवडणुकीत १४ हजार २७३ मते मिळाली.



बांकीपूर हा विधानसभा मतदारसंघ पाटणा शहरात आहे. अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपची हक्काची जागा म्हणून ओळखला जात होता. याच मतदारसंघातून नितीन नवीन आमदार झाले होते. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राज्यसभेवर निवडून आल्यानंतर आमदारीकीचा राजीनामा दिला. यामुळेच बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. भाजपने या पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या नीरज कुमार यांना उमेदवारी दिली तर जन सुराज पार्टीकडून स्वतः प्रशांत किशोर रिंगणात उतरले होते. यामुळे पोटनिवडणुकीत नीरज कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात चुरस होईल असे चित्र निर्माण झाले होते. प्रत्यक्षात मतमोजणीवेळी सुरुवातीपासूनच प्रशांत किशोर आघाडीवर दिसत होते. हळू हळू आघाडी वाढवत प्रशांत किशोर यांनी पोटनिवडणूक जिंकली.



लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे निवडणूक सल्लागार म्हणून काम केलेल्या प्रशांत किशोर यांनी २०२६ मध्ये भाजप विरोधात बिहारमध्ये निवडणूक रिंगणात उतरून विजय मिळवला. यामुळे राजकीय अभ्यासक या विजयाला विशेष महत्त्व देत आहे. प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे बिहारच्या विधानसभेत तेजस्वी यादव यांच्या व्यतिरिक्त आणखी एक प्रभावी नेता दिसणार आहे. याचा राजकीय परिणाम काय असेल यावरून चर्चेला उधाण आले आहे.



दतियाच्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय


मध्य प्रदेशमधील दतिया विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांचा विजय झाला आहे. त्यांना ६६ हजार ७५७ मते मिळाली. भाजपच्या आशुतोष तिवारी यांना ६० हजार ७४१ मते मिळाली.


मांजलपुरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय


गुजरातमधील मांजलपुर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या सतेंद्रभाई पटेल यांचा विजय झाला. त्यांनी काँग्रेसच्या भीखाभाई रबाडींचा ३० हजार ६३० मतांनी पराभव केला.

Comments
Add Comment

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग