Rohit Pawar : प्रकृती अस्वास्थ्यामुळे रोहित पवार रुग्णालयात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले सातत्यपूर्ण राजकीय दौरे, पक्षाच्या विविध बैठका आणि कामाच्या प्रचंड ताणामुळे त्यांची तब्येत बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.






आमदार पवार यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप आणि थकवा जाणवत होता. प्रकृतीची साथ नसतानाही त्यांनी सोमवारी सकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) कार्यालयात जाऊन आयुक्तांची भेट घेतली. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीनंतर त्रास वाढल्याने त्यांनी तातडीने ब्रीच कँडी रुग्णालय गाठण्याचा निर्णय घेतला.



रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या प्राथमिक तपासण्या सुरू केल्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार असल्याचे समजते. आमदार पवार यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही, सततच्या दगदगीमुळे त्यांना वैद्यकीय सल्ल्याची गरज भासल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर आणि आवश्यक उपचार पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा नियमित कामकाजात सक्रिय होतील.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी