Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती



नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘रामगिरी’ येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.



विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम युवा शक्ती घडविण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे . युवकांनी अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून शिक्षण, कौशल्य, क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. व्यसनमुक्त भारत आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन, शैक्षणिक संस्था, पालक, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.



'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' हे अभियान युवकांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती निर्माण करून त्यांना सकारात्मक, निरोगी आणि जबाबदार जीवनशैलीकडे प्रेरित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील