CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज असलेल्या ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे (ICCC) सीबीडी बेलापूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात आज मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या अत्याधुनिक कमांड सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. (CM Devendra Fadnavis)



नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्यातून साकारलेल्या या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व रोजगार हमी मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य रविंद्र फाटक, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, विधानसभा सदस्य मंदाताई म्हात्रे, महेश बालदी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील व पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्यासह विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, मुंबई महानगरपालिकेचे मुख्य अभियंता शिरीष आरदवाड आदी मान्यवर उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis)


‘ऑलवेज वॉचिंग, ऑलवेज प्रोटेक्टिंग’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या ‘प्रहारी’ प्रणालीमुळे शहरातील प्रत्येक हालचालीवर चोवीस तास बारीक नजर ठेवली जाणार असून वाहतूक नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हे केंद्र नवी मुंबई पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. (CM Devendra Fadnavis)


Comments
Add Comment

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३