Gold News : आता लॉकरमध्ये पडलेल्या सोन्यातून मिळणार नफा! वर्षाला ४% अतिरिक्त सोनं मिळवण्याची नवी योजना; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मुंबई : भारतीय कुटुंबांमध्ये सोन्याला गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानले जाते. अनेकजण भविष्यातील गरज लक्षात घेऊन सोने खरेदी करतात, तर काहीजण दागिन्यांच्या स्वरूपात ते जपून ठेवतात. मात्र, हेच सोने अनेकदा घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये वर्षानुवर्षे निष्क्रिय पडून राहते. आता अशा सोन्यातूनही दरवर्षी अतिरिक्त कमाई करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. (Gold News)


डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्म SafeGold आणि प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड BlueStone यांनी संयुक्तपणे एक अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांचे फिजिकल सोने डिजिटल गोल्डमध्ये रूपांतरित केले जाईल आणि त्यावर वर्षाला ४ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकणार आहे. (Gold News)



योजनेचा लाभ कसा घ्याल?


या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी आपले जुने सोन्याचे दागिने किंवा सोन्याची नाणी BlueStone च्या स्टोअरमध्ये नेणे आवश्यक आहे. तेथे सोन्याचे वजन आणि शुद्धता तपासल्यानंतर SafeGold च्या माध्यमातून ते डिजिटल गोल्डमध्ये रूपांतरित केले जाईल. यानंतर हे डिजिटल सोने 'लीझ'वर दिले जाईल. त्याबदल्यात मिळणारा ४ टक्के परतावा रोख स्वरूपात न देता, ग्राहकाच्या डिजिटल गोल्ड खात्यात अतिरिक्त सोन्याच्या ग्रॅमच्या स्वरूपात जमा केला जाईल. त्यामुळे काळानुसार ग्राहकाकडे असलेल्या सोन्याचे प्रमाण वाढत जाईल. (Gold News)



३० हजार टन सोनं अर्थव्यवस्थेत आणण्याचा प्रयत्न :


SafeGold आणि BlueStone यांच्या माहितीनुसार, भारतीय घरांमध्ये आणि लॉकरमध्ये सुमारे ३० हजार टन सोने निष्क्रिय अवस्थेत पडून आहे. हे सोने पुन्हा बाजारात आणून ज्वेलरी उद्योगासाठी उपलब्ध करून देणे आणि देशाचे सोन्यावरील आयात अवलंबित्व कमी करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. (Gold News)



काही नियम अद्याप स्पष्ट नाहीत :


ही योजना आकर्षक असली तरी काही महत्त्वाच्या बाबींची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सोन्याचा लीझ कालावधी किती असेल, सेवा शुल्क किती आकारले जाईल, पात्रतेचे निकष काय असतील आणि सुरुवातीला ही सुविधा BlueStone च्या कोणत्या स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल, याबाबत कंपन्यांकडून पुढील घोषणा होणे अपेक्षित आहे. (Gold News)



SafeGold चे संस्थापक आणि सीईओ गौरव माथुर यांनी सांगितले की, "लॉकरमध्ये पडून असलेल्या सोन्याला डिजिटल मालमत्तेत रूपांतरित करून ग्राहकांना अतिरिक्त सोने कमावण्याची संधी देणे हा आमचा उद्देश आहे." तर BlueStone चे संस्थापक गौरव कुशवाह यांनी सांगितले की, "आमचे रिटेल नेटवर्क जुने सोने संकलित करून ही नवी सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल." (Gold News)

Comments
Add Comment

Bhuleshwar Ganpati Incident : मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

Jamkhed : नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्र बॉम्बने उडविण्याची धमकी; डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

जामखेड : नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत एका व्यक्तीने शिवीगाळ

USA : अमेरिकेतून ५,२०० भारतीय हद्दपार

वॉशिग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई