सिक्किम : कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरच्या सीमा तणावामुळे २०२० पासून बंद असलेला भारत-चीन सीमा व्यापार तब्बल ६ वर्षांच्या खंडानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृतपणे पुन्हा सुरू झाला आहे. सिक्किमचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री टी. टी. भुटिया यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांच्या आर्थिक जीवनाला आणि उपजीविकेला मोठा आधार मिळेल, असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी सिक्किममधून कैलास मानसरोवर यात्रा सुरू झाल्यापासून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
तुमच्या मित्रासाठी एखादे खास सरप्राइज शोधत आहात? ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ५ उत्तम भेटवस्तू... मैत्री हे आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यांपैकी ...
सिक्किमची हस्तकला, हातमाग आणि सेंद्रिय उत्पादनांना जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. या व्यापारामुळे स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. सध्याच्या ३६ व्यापारी वस्तूंच्या यादीत सुधारणा करून घोडे, शेळ्या यांसारख्या पारंपरिक वस्तूंएवजी औद्योगिक उत्पादनांचा समावेश करावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.
महापालिका कर्मचारी नगरसेवकाच्या प्रसंगावधनाने त्वरीत बसवले झाकण https://prahaar.in/2026/08/02/13-bomb-blast-cases-solved-under-dovals-guidance-commended-by-union-home-minister-amit-shah/ मुंबई : कुर्ला साकीनाका येथे पर्जन्य ...
दैनिक व्यापार मयदित वाढ
सध्याची दररोजच्या २ लाख रुपयांपर्यंतची व्यापारी मर्यादा बदलून, आजच्या चलन मूल्याच्या निकषानुसार ती वाढवण्यात यावी, असा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या व्यापारासाठी सुमारे ५०० व्यापाऱ्यांनी अर्ज केले असून, त्यापैकी ३०० जणांची कागदपत्रे आणि पडताळणी पूर्ण झाली आहे. सर्व व्यापाऱ्याऱ्यांना लवकरच पास मिळून पुढील दोन आठवड्यांत हा व्यापार पूर्ण गती पकडेल, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. समुद्रसपाटीपासून १४,००० फुटांपेक्षा अधिक उंचीवर असलेली नाथुला खिंड हा भारत आणि चीनमधील ऐतिहासिक रेशीम मार्गाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दोन्ही देशांच्या बरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत हा व्यापार पुन्हा सुरू केला.






