Bollywood Movie : मिर्झापूर द मूव्हीच्या हाय-एनर्जी रॅप गाण्यात दिसणार का ढांडा न्योलीवाला?

टीझरला मिळालेल्या प्रचंड आणि जबरदस्त प्रतिसादानंतर आता "मिर्झापूर द मूव्ही" हा चित्रपट(Movie) ११ ऑगस्ट रोजी आपल्या अधिकृत ट्रेलरच्या रिलीजची पूर्ण तयारी करत आहे. यानंतर हा बहुप्रतिक्षित (long awaited) चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये (Multiplex) प्रदर्शित होणार आहे.


मिर्झापूर द मूव्हीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता सातत्याने वाढत असून, आता निर्माते चित्रपटात आणखी एक धमाकेदार सरप्राइज जोडण्याच्या तयारीत आहेत. प्रकल्पाशी संबंधित एका जवळच्या सूत्रानुसार, वेगाने लोकप्रिय होत असलेला हरियाणवी रॅपर, गायक आणि गीतकार ढांडा न्योलीवाला या चित्रपटातील एका खास रॅप ट्रॅकमागे सहभागी झाला आहे.



 रफ-टफ आणि हाय-ऑक्टेन रॅप गाणे :


प्रकल्पाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बूम शाका लाका, रशियन बंडाना आणि नाईफ ब्राउज यांसारख्या सुपरहिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ढांडा न्योलीवालाला मिर्झापूर: द मूव्हीसाठी एका दमदार रॅप ट्रॅकमध्ये सामील करण्यात आले आहे. हे गाणे चित्रपटाच्या रफ-टफ आणि हाय-ऑक्टेन जगाशी पूर्णपणे सुसंगत असेल आणि प्रेक्षकांना एक जबरदस्त म्युझिकल अनुभव देईल.
आपल्या दमदार हरियाणवी गाण्यांमुळे आणि वेगळ्या शैलीमुळे ओळखला जाणारा ढांडा न्योलीवाला हा हरियाणातील न्योली गावाचा रहिवासी आहे. त्याने अत्यंत कमी कालावधीत इंडिपेंडंट म्युझिक इंडस्ट्रीतील सर्वात आशादायी कलाकारांपैकी एक म्हणून स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. त्याच्या सहभागामुळे चित्रपटाच्या संगीताला नवा फ्लेवर मिळण्याबरोबरच मिर्झापूरच्या दमदार आणि हाय-एनर्जी विश्वाला तो आणखी प्रभावी बनवेल.



चित्रपटातील स्टारकास्ट आणि Production Team :


मिर्झापूर द मूव्हीमध्ये अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी आणि सोनल एस चौहान हे कलाकार या फ्रेंचायझीच्या नव्या अध्यायात एकत्र दिसणार आहेत.
मिर्झापूर द मूव्हीची निर्मिती ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांनी सादर केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर हे एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली चित्रपटाचे निर्माते आहेत, तर कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी सहनिर्माते आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत (Multiplex) प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित