Nitesh Rane : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला चहा-भजीचा आस्वाद

मसूरे : सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि त्यांच्या प्रेमाचा मान राखणे... ही राणे कुटुंबाची खास ओळख! याच संस्कारांची आणि राणे कुटुंबाची जनतेशी बांधलेली घट्ट नाळ पुन्हा एकदा सिंधुदुर्गवासीयांना शुक्रवारी सायंकाळी पाहायला मिळाली.



शुक्रवारी दिवसभर कणकवली, ओरोस, मालवण आणि मसूरे अशा विविध ठिकाणी उद्घाटन व इतर प्रशासकीय कार्यक्रमांचा झंझावाती दौरा आटोपून महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे कणकवलीच्या दिशेने निघाले होते. दिवसभराच्या धावपळीनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता.



मसूरे येथील कार्यक्रम संपवून पालकमंत्री विरण नाक्यावरून जात असताना, राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांचे खंदे आणि जेष्ठ कार्यकर्ते, माजी जि. प. बांधकाम सभापती अनिल कांदळकर हे आपल्या सहकाऱ्यांसह हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी उभे होते. मंत्री नितेश राणेंचा ताफा थांबताच कांदळकर यांनी साद घालत त्यांना आग्रह केला, "साहेब, चहा घेऊनच जा!" मंत्रिपदाचे वलय आणि सुरक्षेचा ताफा सोबत असताना सहसा कोणी अशा आग्रहाला थांबत नाही, पण नितेश राणे वेगळ्या संस्कारात घडलेले आहेत. कार्यकर्त्याची आपुलकीची हाक ऐकताच मंत्रिमहोदयांनी "तुमचा चहा टाकून कोण पुढे जाईल?" असे उद्गार काढले.



मंत्र्यांचे हे शब्द ऐकून उपस्थितांचे डोळे अभिमानाने भरून आले. नितेश राणे यांनी थेट कांदळकरांच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. हॉटेलच्या बाकावर बसून पालकमंत्र्यांनी अगदी घरच्यासारखा कुरकुरीत कांदा भजी आणि चहाचा आस्वाद घेतला. फक्त चहा-भजीच नाही, तर तिथल्या स्थानिक ग्रामस्थांशी गप्पा मारत प्रत्येकाची आस्थेने चौकशी केली. यावेळी अनिल कांदळकर, माजी सरपंच आपु आंबेरकर, विलास पांजरी, अजयकुमार सर्वगोड, चुनवरे गावचे सुपुत्र व पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.



जनतेच्या हृदयातील 'राणे' कुटुंब


राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणेंपासून सुरू झालेला हा प्रेमाचा आणि विश्वासाचा वारसा आज पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे पुढे चालवत आहेत. पद आणि अधिकार येतात-जातात, पण कार्यकर्त्यांच्या शब्दाला आणि प्रेमाला दिलेला हा मानच "राणे कुटुंबा"ला जनतेच्या हृदयात कायम स्थान मिळवून देतो. एका कार्यकर्त्याच्या शब्दासाठी गाडीतून उतरून चहा पिणारे पालकमंत्री नितेश राणे पाहून उपस्थितांनी "आपला माणूस तो हाच!" अशीच भावना व्यक्त केली. चहा-भजीचा आस्वाद घेत आणि सर्वांचे आपुलकीने आभार मानत पालकमंत्री नितेश राणे पुढील नियोजित दौऱ्यासाठी कणकवलीच्या दिशेने रवाना झाले, पण त्यांच्या या साधेपणाची आणि आपुलकीची चर्चा मात्र या निमित्ताने होत आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhaji : देवा...किती किळसवाणा प्रकार! पप्पांनी कचोरी आणली अन् त्यात उंदराच्या लेंड्या; ५ पैकी २ कचोऱ्या मुलांनी खाल्ल्याने नागरिकांत संताप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर शहरात (Vaijapur Area) अन्नाची अवहेलना आणि ग्राहकांच्या

Nalasopara Viral Video : नालासोपाऱ्यात हॉटेलच्या भातावर उंदरांचा हैदोस; ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेलवर कठोर कारवाईची मागणी

नालासोपारा : वसई-विरार महापालिका (Vasai-Virar Mahanagpalika) क्षेत्रातील नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातून एक अत्यंत

Nashik Crime : नाशिकमध्ये चाललंय काय ? रविवार कारंजावर टवाळखोरांचा धुमाकूळ, रिक्षाचालकाला अडवून थेट...

Nashik Crime : नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असं नाशिक पोलीस गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून वदवून घेत असले

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स