Fadnavis : 'माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल'

पुणे : माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस म्हणाले. ते पुण्यात देवाभाऊ नावाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.


बाळासाहेब फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले. तसेच आगामी काळात देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला.



देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या स्थितीत सर्वोच्च नेते म्हणून ओळखले जातात. अनेक राजकीय अभ्यासक त्यांना महाराष्ट्रातले सध्याचे सर्वाधिक ताकदीचे नेते म्हणतात. तब्बल तीन वेळा फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आमदार - विरोधी पक्षनेता - मुख्यमंत्री - विरोधी पक्षनेता - उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास करणारे आणि आजच्या घडीला राज्याचे राजकारण स्वतःभोवती केंद्रीत करणारे एकमेव नेते असेही राजकीय अभ्यासक देवेंद्र फडणवीस यांचे वर्णन करतात. याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून राजकीय विश्लेषक बघत आहेत.



"लोकसभेच्या २०२९ च्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस हे एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असे काही राजकीय अभ्यासकांचे मत आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा निवडून आला. खरोखरच इतक्या लहान वयात मला नाही वाटत इतिहासात कुणी यशस्वी झालं असेल. तसा माझ्या पुतण्या अतिशय धीरगंभीर आहे. तो घरात राजकारणाच्या गोष्टीच करत नाही. तर कुटुंबाच्या गोष्टी करतो. त्यावेळेस तो अतिशय मोकळा असतो. असा हा माझा पुतण्या खरोखर आज ना उद्या भारताचा पंतप्रधान असेल, असं मला वाटतं"; असं बाळासाहेब फडणवीस म्हणाले.



चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. "मुख्यमंत्र्यांना दैवी शक्ती मिळाली आहे. कारण एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात. तो संघटकही असतो, तो राज्यकर्ताही असतो, तो मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, तो लिहितोही प्रचंड, तो कुटुंबवत्सल आहे. आपल्या एकेक कुटुंबातील सदस्याच्या आयुष्यातील घटना लक्षात घेऊन तो अभिनंदन आणि सांत्वन करत असतो. हे सर्व एका माणसात सापडणं अवघड असतं", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Comments
Add Comment

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

Jamkhed : नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्र बॉम्बने उडविण्याची धमकी; डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

जामखेड : नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत एका व्यक्तीने शिवीगाळ

USA : अमेरिकेतून ५,२०० भारतीय हद्दपार

वॉशिग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)