मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत सहा मजल्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरु होते आणि ते सन २०२३-२४मध्ये संपले. यापूर्वी आतापर्यंत मुख्यालय इमारतींवर १२० कोटींहून अधिकचा खर्च केल्यांनतर आता पुढील दोन वर्षांत या विस्तारीत इमारतीच्या डागडुजीवर तब्बल साडे आठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या इमारतीला वाळवी लागल्याच्या प्रकरणावरून स्थायी समितीने याची विस्तृत माहितीच सादर करण्याचे निर्देश यापूर्वी दिलेले आहेत.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची विस्तारीत इमारत ही सन १९६० मध्ये बांधण्यात आली आहे. यापूर्वी, या इमारतीचे नूतनीकरण, व दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या इमारत बांधकाम विभागामार्फत सन २०१४ साली करण्यात आले. या कामासाठी कंत्राटदार शानदार इंटेरिअर प्रा. लि. आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे. शशी प्रभू अँड असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर कंत्राटदार मे. शानदार इंटेरिअर प्रा.लि. यांच्याकडून इमारतीची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीचा अंतीम टप्पा सन २०२३-२४ मध्ये पुर्ण झाल्यानंतर इमारत दुरुस्तीचे काम इमारत बांधकाम खात्याकडून संपुष्टात आले.
४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६ वर्षीय महिलेला गेल्या दोन वर्षांपासून ...
पण आता पुन्हा या इमारतीच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. इमारतीच्या कोर्ट व आझाद मैदान भागाकडील बाह्यभागावरील मालाड क्रेट व बाह्य प्लास्टरची दुरुस्ती करणे, एक्स्साईज इमारत दिशेच्या इमारतीच्या बाह्यभागावरील व अंतर्गत भागातील खराब झालेले सीआय, जीआय पाईप्स बदली करणे, इमारतीच्या आझाद मैदान दिशेकडील दगडी भिंतीची स्वच्छता व फ्लश पॉइंटिंग करणे. इमारतीच्या तळघरातील विविध ठिकाणची दुरुस्ती व नूतनीकरण जसे की पुरुष सुरक्षा कक्ष, युनियन कार्यालय, दूरध्वनी कक्ष व पार्किंग क्षेत्रातील संरचनात्मक दुरुस्ती करणे, सर्व मजल्यांवरील अंतर्गत कार्यालयातील मॉडयूलर छत दुरुस्तीचे काम करणे, तळघरात दिव्यांगांकरीता शौचालय तयार करणे, तळभागात विविध ठिकाणी संरचनात्मक दुरुस्ती करणे, महिला व पुरुष सामान्य शौचालयांचे (तळमजला ते सहावा मजला) दुरुस्ती/नूतनीकरण करणे, इमारतीच्या गच्चीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करणे, पंप रूमची अंतर्गत दुरुस्ती करणे, विद्यमान सर्वसामान्य हाऊस गली, पावसाळी पाणी जलवाहीन्यांची व सांडपाण्याच्या पाईपची दुरुस्ती करणे, विद्यमान स्थितीतील भुमिगत पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीचे काम करणे, तळमजल्यावरील कँटीन व पाचव्या मजल्यावरील उर्वरीत अग्निशमन यंत्रणेची कामे करणे, तळमजल्यावरील कँटीनमधील विविध स्थापत्य दुरुस्तीची कामे करणे, तळघर पार्किंगजवळ भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे आदींचा समावेश आहे. या कामांसाठी निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामांसाठी महेंद्रा रिअल्टर्स व इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांची निवड करण्यात आली असून याकरता ६,.८३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इमारतीमध्ये बऱ्याच ठिकाणी काही दुरुस्तीची कामे जुन्या कामात अंतर्भुत करण्यात आली नसल्याने इमारत बांधकाम खात्याकडून करण्यात आली नाहीत. सद्यस्थितीत इमारतीची बाहेरील अवस्था जीर्ण व निकृष्ट झालेली असून, उत्तर व पश्चिम दिशेच्या बाह्य भिंतींमधून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गळती होत असते. इमारत बांधकाम खात्याच्या निविदेत बरीच दुरुस्तीची कामे समाविष्ट नसल्याने या दुरुस्तीची कामेही प्रलंबित आहे. या इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती, इमारतीच्या गच्चीवरील व विविध मजल्यावरील शौचालायात जलनिरोधीकरणाचे काम करण्याची गरज आहे. तसेच इमारतीच्या बऱ्याच भागात भिंतीचा रंग निघाला आहे, व भिंतीस आणि दरवाज्या-खिडक्याना बुरशी निर्माण झालेली आहे तसेच काही विद्युत यंत्रणांची देखील दुरुस्तीची कामे करण्याचे आवश्यक आहे. यामुळे विस्तारीत इमारतीची तातडीने उर्वरीत कामांतर्गत दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पालघर : पालघर जिल्ह्यात २२ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे सार्वजनिक रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात ...
आजवर दुरुस्ती, नूतनीकरणावर तब्बल १२०कोटींचा खर्च
मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील मुख्य इमारतीच्या रंगीत काचांची पुनर्स्थापना करण्याचे काम ऑगस्ट २०१० मध्ये मंजूर करत मेसर्स ग्लास सेन्सेशन या कंत्राटदार कंपनीला ८२ लाख ५२ हजार ९०९ रुपयांत देण्यात आले. ऑक्टोबर २०११ रोजी मेसर्स शानदार इंटिरिअर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारास ६८.७७ कोटी रुपयांस देण्यात आले. मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील विस्तारित इमारतीच्या नूतनीकरण कामाचा यात समावेश आहे. तर मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील विस्तारित इमारतीच्या नूतनीकरण कामावर ४३ कोटी ७०लाख ७१ हजार २१८ रुपयांचे कंत्रात मेसर्स स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारास जून २०१२ रोजीदेण्यात आले.





