Ajit Doval : डोवाल यांच्या मार्गदर्शनात १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून गौरव

पुणे : लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी अजित डोवाल यांचा गौरव करताना अमित शहा म्हणाले की, मी गुजरातचा गृहमंत्री असताना डोवाल यांच्या मार्गदर्शनामुळे १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा झाल्याचे सांगितले.



या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तथा पुरस्काराचे मानकरी अजित डोवाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक आणि आमदार डॉ. प्रणिती टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.



लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून, विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असेही शहा यांनी म्हटले.



एका धुरंधराकडून दुसऱ्या धुरंधराचा सत्कार : मुख्यमंत्री


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल मांना राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील 'चाणक्य' संबोधले, तर अमित शहांच्या उपस्थितीवर भाष्य करताना "एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले आहेत," असे गौरवोद्‌गार काढले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले को, संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित करणाऱ्या डोवाल यांना हा पुरस्कार मिळत असल्याचा आनंद आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील चाणक्य असलेल्या डावाल घांना सन्मानित करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील चाणक्य असलेले अमित शहा पुण्यात उपस्थित राहणे हा एक उत्तम योग आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानंतर देशाच्या सुरक्षेचे धोरण पूर्णपणे बदलल्याचे फडणवीस यांनी सांगितले.



पुण्याशी असलेले भावनिक नाते


सत्काराला उत्तर देताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यानी पुण्यात येऊन हा पुरस्कार स्वीकारताना आनंद व्यक्त केला. माझे वडील सैन्यात होते. मी लहान असताना आम्ही जवळपास दीड वर्षे पुण्यात राहिलो होतो. माझी आई मला दर मंगळवारी न चुकता चतुःशृंगी देवीच्या मंदिरात घेऊन जायची त्यानंतर वडिलांची बदली झाल्यामुळे पुन्हा पुण्यात येण्याचा योग आला नाही; परंतु बरोबर ७६ वर्षानंतर आज थेट लोकमान्य टिळकांच्या नावाचा मानाचा पुरस्कार घेण्यासाठी पुण्यात येण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला सार्थ अभिमान आहे." अशा शब्दांत त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

Comments
Add Comment

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न