पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्री-कास्ट आणि पॉलिमर टेक्नो पॅच पद्धतीचा वापर केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामासाठी स्वतंत्र टीम चाकणमध्ये पाठवली असून, प्रत्यक्ष खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या समस्येबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजकांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडवण्यावर चर्चा झाली होती.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच करीनाचा एक व्हिडिओ ...
बैठकीनंतर शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सीएनसी कंपनीचे सत्या लांडगे यांच्या सहकार्याने स्वतंत्र टीम चाकणमध्ये पाठवण्यात आली. टीमने परिसरातील रस्त्यांची पाहणी केली असता रस्त्यांवर तसेच साइड शोल्डरवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे आढळले. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे खड्डे आणखी मोठे होत असल्याचेही निदर्शनास आले.
4 टन वजनाचा प्री-कास्ट पॅच
खड्ड्यांचा भाग समतल करून त्यावर एम-60 हार्डनरपासून तयार केलेले प्री-कास्ट पॅच बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक प्री-कास्ट पॅचचे वजन सुमारे 4 टन असून, या मार्गावरून 50 ते 50 टन वजनाचे ट्रक-ट्रेलर धावत असतानाही हे पॅच त्यांचा भार सहन करू शकतील, असा दावा करण्यात आला आहे.
प्री-कास्ट पॅचमुळे खड्डे कमी वेळेत बुजवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होणार आहे. तसेच एम-60 विथ हार्डनरचा वापर करून अन्य खड्ड्यांचीही दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, या कामामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी होऊन उद्योजक आणि स्थानिक नागरिकांना तातडीने दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. बैठक आणि चर्चेपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दल उद्योजकांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.