Swastika Ghosh : कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोषची सुवर्ण झेप

भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची कमाई; चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा ऐतिहासिक पराक्रम


पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथील पदव्युत्तर शिक्षण घेणारी आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू कु. स्वस्तिका संदीप घोष हिने कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप–२०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावून देशासह पनवेल आणि महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचावले आहे.



स्वस्तिका घोष ही महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत असून शिक्षण आणि क्रीडा यांचा उत्कृष्ट समतोल साधत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेगवान, आक्रमक आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण खेळाच्या जोरावर तिने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच यशस्वी वाटचालीचा आणखी एक सुवर्ण अध्याय तिने कॉमनवेल्थ स्पर्धेत लिहिला आहे. भारतीय संघासाठी सुवर्णपदक जिंकून स्वस्तिकाने देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला असून तिच्या या देदिप्यमान कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तिच्या यशामुळे पनवेलच्या क्रीडाक्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.



स्वस्तिकाच्या ऐतिहासिक यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य व आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, क्रीडा संचालक डॉ. विनोद नाईक, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. येवले, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी स्वस्तिका घोष हिने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून महाविद्यालय, पनवेल आणि संपूर्ण देशाचा गौरव वाढविला आहे. तिचे हे यश आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून तिच्या भावी कारकिर्दीसाठी आम्ही मनःपूर्वक शुभेच्छा देतो, अशा शब्दात प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी स्वस्तिका हिचे अभिनंदन केले आहे. स्वस्तिकाच्या या सुवर्ण कामगिरीमुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्रीडा संस्था, नागरिक आणि क्रीडाप्रेमींकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट