Bhai Jagtap : बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगतापांवर गुन्हा दाखल

मुंबई : दिल्ली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा 'एआय-जनरेटेड' व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) गैरवापर आणि खोट्या प्रचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे सहसंयोजक निखिल भामरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र सायबरच्या नोडल पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी आपल्या 'एक्स' खात्यावरून दिल्ली पोलिसांचे डीसीपी सुमीत झा यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ समाजात संभ्रम पसरवणारा आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यावरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५३(२) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.



दरम्यान, या व्हायरल व्हिडिओची पीआयबी आणि दिल्ली पोलिसांनी तात्काळ दखल घेत डीसीपी सुमीत झा यांच्या राजीनाम्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित व्हिडिओ १०० टक्के बनावट आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचे या यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणावर भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फेक एआय व्हिडिओच्या आधारे जनतेची फसवणूक करणे गंभीर स्वरूपाचे असून, जगताप (Bhai Jagtap) यांनी तो व्हिडिओ हटवून महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून (Maharashtra cyber police) या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Amit Satam : एकही आमदार-खासदार नसलेल्या राज ठाकरेंच्या मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची गरज

अमित साटम; शिवउद्योग स्थापन करून किती मराठी तरुणांना उद्योगधंदे दिले? मुंबई : उच्च व

Gold Silver New Rate : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे नवीन दर

मुंबई : ऑगस्ट महिन्याची सुरुवात सराफा बाजारासाठी तेजीची ठरली आहे. १ ऑगस्ट रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या

POP Ganesh Idol Ban Decision 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी मिळण्याची शक्यता

मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; सुवर्णदानाचा मोठा वर्षाव ; तीन दिवसांत ७.८१ कोटींचं दान

Shirdi : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे

Pradhan Mantri pik vima yojana : एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासा! पीक विमा योजनेची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढली

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pradhan Mantri pik vima yojana) सहभागी

Navanath Ban : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नवनाथ बन यांची टीका; भाजपच्या पत्रकार परिषदेत आरोप-प्रत्यारोप

मुंबई : भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार