Friday, July 31, 2026

Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ₹2 लाखांची मदत जाहीर

Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ₹2 लाखांची मदत जाहीर

पीएमएनआरएफमधून मृतांच्या कुटुंबीयांना ₹2 लाख, जखमींना ₹50 हजार

ठाणे : ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी येथे कोहिनूर इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ( Bhiwandi Building Collapse)

पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात, "महाराष्ट्रातील ठाणे येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अत्यंत दु:खद आहे. या कठीण प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो," असे म्हटले आहे. ( Narendra Modi)

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत तात्काळ एफआयआर नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश भिवंडी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देत मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी भिवंडी महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून बचावकार्य अधिक वेगाने राबविण्याच्या सूचना दिल्या. जखमींवर भिवंडीतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून आवश्यकता भासल्यास त्यांना खासगी रुग्णालयातही हलविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Bhiwandi)

गुरुवारी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास भिवंडीतील बालाजी नगर परिसरातील चार मजली कोहिनूर इमारतीचा काही भाग कोसळून हा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. इमारतीत एकूण 48 खोल्या असून प्रत्येक मजल्यावर 12 खोल्या होत्या. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >