Navnath Ban : संजय राऊत, राहुल गांधींची पळपुटे विरोधक म्हणून इतिहासात नोंद होणार

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली निर्भत्सना


मुंबई : परीक्षा विधेयक मंजूर होत असताना राहुल गांधी, काँग्रेस आणि संजय राऊत यांनी संसदेतून पळ काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शहा यांच्या नेतृत्वात यापुढे पेपरफुटी झाली तर दहापट शिक्षा आणि दहापट दंड वसूल केला जाणार आहे. असे ऐतिहासिक विधेयक मंजूर होत असताना विरोधकांनी पळ काढला. कारण तुम्हाला या देशातील विद्यार्थ्यांचे हित नको आहे. तुम्हाला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आणि राहुल गांधींचे हित हवे आहे. देशाच्या इतिहासात तुमची नोंद पळपुटे विरोधक म्हणून केली जाणार आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांची निर्भत्सना केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Navnath Ban)




अभिजीत दीपके यांचा विष्णूचा अवतार म्हणून गौरव करत देव-देवतांचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला कीव येत आहे. जनाब संजय राऊत, तुम्हाला त्यांच्या बुद्धीची कीव आली नाही का?, असा सवाल करून श्री. बन म्हणाले, पुणेकरांनी अमितभाई शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना पुरस्कार देत गौरव करण्याचा निर्णय घेतला तर संजय राऊत यांच्या पोटात का दुखते? अमितभाई शहा यांचे कर्तृत्व काय आहे, हे देशाने पाहिले आहे. संजय राऊतांना लोकमान्य टिळक यांचे नाव घेण्याचाही तुम्हाला अधिकार नाही. कारण तुम्ही आता राहुल गांधींची गुलामी करत आहात. तुम्ही आता महाराष्ट्राचे आणि हिंदुस्थानचे भक्त नाही. सोनिया गांधींचे गुलाम म्हणून काम करण्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे आणि ती तुम्ही पार पाडत आहात. तुम्हाला भांडुपच्या गाढव नाक्याचाही पुरस्कार दिला जात नाही त्याबद्दल आत्मपरीक्षण करा, असे नवनाथ बन यांनी सुनावले.




संजय राऊत, ईस्ट इंडिया कंपनीची तुलना भाजपासोबत करताना आपण भ्रष्ट इंडिया कंपनीत आहात, याची जाणीव ठेवा. कारण तुमची इंडिया आघाडी भ्रष्ट असल्याने जनतेने तुमचे नामकरण ‘भ्रष्ट इंडिया कंपनी’ असे केले आहे. आपण स्वतः भ्रष्ट इंडिया कंपनीचे चालक - मालक आहोत, याचे भान भाजपावर टीका करताना बाळगा. ईस्ट इंडिया कंपनीला या देशातून हाकलण्याचे काम देशातील नागरिकांनी केले. आणि तुमच्या भ्रष्ट इंडिया कंपनीला घालवण्याचे, नाकारण्याचे आणि घरी बसवण्याचे कामही देशातील जनतेने केले असल्याचे श्री. बन म्हणाले.‘इधर से आलू डालूंगा, उधर से सोना निकालूंगा’ हे संशोधन करणाऱ्या राहुल गांधींना या जगातलाच नाही तर अंतराळातलाही एखादा पुरस्कार दिला पाहिजे. या संशोधनाबद्दल संजय राऊत तुम्ही नेमक्या कुठल्या पुरस्काराची घोषणा करणार आहात? हा पुरस्कार देण्यासाठी संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय नाही, तर अंतराळातील एक संस्था स्थापन केली पाहिजे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नका. काही गाड्यांवर हातांचे ठसे असतात. त्या ठशांच्या माध्यमातून गुन्हेगारांचा तपास पोलीस अधिकारी करतात त्या संदर्भात चंद्रकांतदादा यांचे ते वक्तव्य होते, असे नवनाथ बन यांनी स्पष्ट केले.(Navnath Ban)

Comments
Add Comment

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,

Gym trainer commits suicide : परळीत जिम ट्रेनर तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

बीड: परळी शहरातील इंदिरानगर परिसरात एका २३ वर्षीय जिम ट्रेनर तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा

Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखत भारताची पुढील फेरीत वाटचाल

हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये गुरुवारी भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये डी गटातील अखेरचा साखळी सामना रंगला. अत्यंत

Four-year-old Aarohi :आईपासून दुरावलेली चार वर्षीय आरोही पोलिसांच्या प्रयत्नांनी सुखरूप घरी

लातूर : देवणी येथील आठवडी बाजारात आईपासून दुरावलेल्या अवघ्या चार वर्षीय आरोहीचा देवणी पोलिसांनी अवघ्या चार

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि

Sanjay Rathod : मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर