High Court on FDA : हायकोर्टाच्या दणक्यानं मंत्रालयातील कँटिनचं रूप पालटलं; अन्न सुरक्षेच्या नियमांची कडक अंमलबजावणी!

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यांनंतर आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईच्या धसक्याने मंत्रालयातील उपाहारगृहाचे (कँटिन) रूप एका झटक्यात बदलल्याचे समोर आले आहे. कालपर्यंत अस्वच्छता आणि नियमांच्या उल्लंघनामुळे चर्चेत असलेल्या याच कँटिनमध्ये आता अचानक स्वच्छता आणि सुरक्षेचे काटेकोर नियम पाळले जात असल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांच्या हातात हँडग्लोव्हज, डोक्यावर कॅप्स आणि खाद्यपदार्थांवर करकरीत नवीन जाळ्या झाकलेल्या दिसत आहेत. आज सकाळी हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर एफडीए आणि वकिलांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली आहे.



हायकोर्टाकडून एफडीएची कानउघाडणी


तत्पूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रालयातील कँटिनच्या स्वच्छतेवरून आणि एफडीएच्या '९८ टक्के स्वच्छतेच्या' दाव्यावरून जोरदार कानउघाडणी केली होती. सुनावणीदरम्यान एफडीएच्या वकिलांनी कँटिन ९८ टक्के स्वच्छ असल्याचा दावा केला होता. यावर न्यायालयाने खोचक सवाल करत म्हटले की, "मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्येही एखादी माशी किंवा झुरळ आढळू शकते, मग मंत्रालयाचे कँटिन इतके निर्दोष कसे असू शकते? एवढ्या मोठ्या उपाहारगृहात एकही कीटक आढळला नाही यावर कसा विश्वास ठेवायचा?"


तसेच, एफडीएने न्यायालयात केवळ काही फोटो सादर केल्यामुळे न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तपासणीचे फोटो न दाखवता व्हिडिओ का काढला नाही, असा थेट सवाल करत हायकोर्टाने आज दुपारी ३ वाजेपर्यंत कँटिनचे व्हिडिओ सादर करण्याचे सक्त निर्देश दिले होते.



कँटिनमध्ये अचानक बदल


कोर्टाच्या या दणक्यानंतर मंत्रालयाच्या कँटिनमध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने लागू करण्यात आल्या आहेत. सर्व अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवले जात असून कर्मचारी पूर्ण स्वच्छतेची काळजी घेताना दिसत आहेत. मात्र, एका रात्रीत झालेला हा बदल पाहून मंत्रालय कर्मचारी आणि सामान्य नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. प्रशासनाच्या या अचानक जागृतीमुळे आता अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Tehsildar Promotion : ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, तर २५ नायब तहसीलदार तहसीलदारपदी पदोन्नत

मुंबई : महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Cow Breed & Sheep Breed : महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान; उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर 'माडग्याळ' प्रजातीच्या

AI smart goggles : 'एआय स्मार्ट गॉगल्स'च्या वापराबाबत येणार निर्बंध; राज्य सरकारचे'एसओपी' तयार करण्याचे निर्देश

सायबर विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती

Strict move by FDA : सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद, 'एफडीए' चे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

मुंबई : नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न 'टीस'च्या अहवालानंतर दोन महिन्यात मार्गी लावणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मंत्री नितेश राणे यांच्यासोबत विशेष बैठक मुंबई : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू

Ashish Shelar : महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र वाङ्मय सात भाषांमध्ये अनुवादित होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या समग्र