Tehsildar Promotion : ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, तर २५ नायब तहसीलदार तहसीलदारपदी पदोन्नत

मुंबई : महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्यातील ५७ तहसीलदारांना उप जिल्हाधिकारी (गट-अ), तर २५ नायब तहसीलदारांना तहसीलदार (गट-अ) पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनातील एकूण ८२ अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार असून रिक्त पदांमुळे निर्माण झालेली प्रशासकीय अडचण कमी होऊन कामकाजाला गती मिळणार आहे.



सन २०२५-२६ च्या निवडसूचीनुसार एस-१९ वेतनश्रेणीतील ५७ तहसीलदारांना एस-२० वेतनश्रेणीतील उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. तर पूरक निवडसूचीनुसार २५ नायब तहसीलदारांना एस-१४ वरून एस-१९ वेतनश्रेणीत तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.


पदोन्नत उप जिल्हाधिकाऱ्यांची सविस्तर पदस्थापना सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील काम पूर्ण झाल्यानंतर महसूल विभाग वाटप नियम, २०२१ नुसार स्वतंत्र आदेशाने करण्यात येणार आहे. नायब तहसीलदारांच्या पदस्थापनांचे आदेशही स्वतंत्रपणे काढण्यात येतील. नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम मान्यतेची अट लागू आहे. तसेच उप जिल्हाधिकारीपदी पदोन्नत अधिकाऱ्यांना पुढील पदोन्नतीपूर्वी संबंधित महसुली विभागात किमान तीन वर्षे सेवा करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Cow Breed & Sheep Breed : महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान; उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर 'माडग्याळ' प्रजातीच्या

AI smart goggles : 'एआय स्मार्ट गॉगल्स'च्या वापराबाबत येणार निर्बंध; राज्य सरकारचे'एसओपी' तयार करण्याचे निर्देश

सायबर विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती

Strict move by FDA : सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद, 'एफडीए' चे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

मुंबई : नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न 'टीस'च्या अहवालानंतर दोन महिन्यात मार्गी लावणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मंत्री नितेश राणे यांच्यासोबत विशेष बैठक मुंबई : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू

Ashish Shelar : महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र वाङ्मय सात भाषांमध्ये अनुवादित होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या समग्र

Late Singer Mukesh : संगीत क्षेत्रासाठी सुवर्णयोग; स्वर्गीय गायक मुकेश यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त 'स्वर्गीय गायक मुकेश गौरव समिती' स्थापन!

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे अजरामर पार्श्वगायक स्वर्गीय मुकेश यांच्या ५० व्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर,