Ashish Shelar : महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र वाङ्मय सात भाषांमध्ये अनुवादित होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या समग्र वाङ्मयाचा सात भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार आहे. हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांमध्ये हा ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. (Ashish Shelar)


सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध साहित्य अकादमींच्या माध्यमातून साहित्यिक आदान-प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये एक दिवसीय अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. (Mahatma Jyotiba Phule)


मराठीतील दर्जेदार साहित्य इतर भाषांमध्ये पोहोचावे आणि देशातील विविध भाषांमधील चांगले साहित्य मराठीत यावे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. भाषांची समृद्धी आणि साहित्याचा प्रसार यासाठी अशा प्रकारचे अनुवाद आणि साहित्यिक आदान-प्रदान महत्त्वाचे असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.



महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फुले यांचे साहित्य सात भाषांमध्ये अनुवादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.


महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समितीने 2012 मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय’ या ग्रंथाचा या उपक्रमासाठी आधार घेतला जाणार आहे. सुमारे 861 पानांचा हा ग्रंथ सात भाषांमध्ये अनुवादित करण्यात येणार आहे. ( Marathi Literature)


या कार्यशाळेत प्रख्यात लेखिका मंजिरी धामणकर, डॉ. शितला प्रसाद दुबे, अजित मन्याल, आलोक सिंह, प्रशांत वर्मा तसेच साहित्य अकादमीचे सचिव सचिन निबांळकर यांच्यासह विविध भाषांतील अनुवादक आणि अभ्यासक सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे महात्मा फुले यांचे विचार आणि साहित्य देशातील अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. (Maharashtra News)


Comments
Add Comment

Strict move by FDA : सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद, 'एफडीए' चे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

मुंबई : नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न 'टीस'च्या अहवालानंतर दोन महिन्यात मार्गी लावणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मंत्री नितेश राणे यांच्यासोबत विशेष बैठक मुंबई : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू

Late Singer Mukesh : संगीत क्षेत्रासाठी सुवर्णयोग; स्वर्गीय गायक मुकेश यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त 'स्वर्गीय गायक मुकेश गौरव समिती' स्थापन!

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे अजरामर पार्श्वगायक स्वर्गीय मुकेश यांच्या ५० व्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर,

Mumbai News : मालवणीत घराचा भाग अचानक कोसळला; बचावकार्य सुरु

मुंबई: मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात गुरुवारी, 20 ऑगस्ट रोजी सकाळी तळमजला अधिक एक मजली घर अचानक कोसळल्याची घटना

Mumbai News : 'बर्गर खाताना अचानक दाताखाली काच आली अन्...'; मुंबईतील नामवंत 'जिमिज बर्गर'चा भयंकर निष्काळजीपणा उघड

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील प्रसिद्ध जिमिज बर्गर या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर

Cab Driver Viral Video : OTP वरून कॅब चालक-पॅसेंजरमध्ये वाद; मराठीत OTP सांगताच चालक भडकला, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापरावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील एका मराठी प्रवाशाचा