Uttarkhand Suicide : लग्नानंतर अवघ्या ८ महिन्यांत शिक्षिकेची आत्महत्या; मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत सासरच्या छळाचा गंभीर आरोप

उत्तराखंड : सरकारी शाळेतील शिक्षिका सृष्टी कंधारी हिने लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत (Uttarkhand Suicide) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूपूर्वी तिने आपल्या आईसाठी एक भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड करत सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी माहेरच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासू आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (Uttarakhand )



मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी कंधारी हिचा विवाह नोव्हेंबर २०२५ मध्ये सौरभ रतुरी याच्याशी झाला होता. आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये ती रडत म्हणते, "आई, मला माफ कर. गेल्या सहा महिन्यांपासून मी सर्व सहन करत होते, पण आता माझ्याकडून होत नाही. या लोकांची मानसिकता कधीच बदलणार नाही. लग्नापासूनच मला सतत टोमणे मारले जात आहेत." (Teacher Suicide)


सृष्टीची आई सीमा कंधारी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, लग्नानंतर तिचा सातत्याने मानसिक छळ करण्यात आला. तिला वारंवार 'अशुभ' ठरवण्यात येत होते आणि घरातील प्रत्येक वाईट घटनेसाठी तिलाच जबाबदार धरले जात होते. (Crime News)



तक्रारीनुसार, लग्नानंतर काही महिन्यांनी सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर छळ अधिक वाढला. एका पुजाऱ्याच्या सल्ल्यानंतर सृष्टी घरात दुर्दैव घेऊन आली असल्याचा समज कुटुंबीयांनी करून घेतला आणि तिचा मानसिक छळ सुरूच ठेवला, असा आरोप करण्यात आला आहे. सासऱ्यांच्या निधनानंतर हा त्रास आणखी वाढल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी पोलिसांनी सृष्टीचा पती, सासू आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आत्महत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास सुरू आहे.


 
Comments
Add Comment

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात

UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील

BRICS : ब्रिक्स प्लस देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी 'न्यायनॉमिक्स' अन् 'न्याय सेतू'

नवी दिल्ली :  ११ व्या ‘ब्रिक्स प्लस लिगल फोरम’च्या उद्घाटनाप्रसंगी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत

LPG Pipeline : देशातील सहा राज्यांमध्ये LPG पाइपलाइनचा विस्तार, केंद्राकडून ७ हजार कोटींची गुंतवणूक आणि १,८०० किमी नव्या पाइपलाइनला मंजुरी

नवी दिल्ली : देशातील एलपीजी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.