Solapur Accident : सोलापूरजवळ भीषण अपघात! पुणे-उमरगा एसटीला ट्रकची जोरदार धडक; चालकासह महिलेचा मृत्यू

शेळगी परिसरातील सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दुर्घटना; 10 प्रवासी गंभीर जखमी



सोलापूर : सोलापूर-हैदराबाद (Solapur-Hyderabad) राष्ट्रीय महामार्गावरील शेळगी परिसरात शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. पुण्याहून उमरग्याकडे जाणाऱ्या एसटी बसला ट्रकची जोरदार धडक बसल्याने एसटी चालकासह एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, ही एसटी बस पुण्यातील कुरकुंभ येथून धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याकडे निघाली होती. पहाटे सुमारे 4.30 वाजता बस सोलापूर मध्यवर्ती एसटी स्थानकात पोहोचली. तेथून प्रवासी घेऊन बस पुढे रवाना झाल्यानंतर शेळगी परिसरात हा भीषण अपघात झाला. (Accident)



प्राथमिक माहितीनुसार, लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला एसटी बसची मागून धडक बसली. या भीषण धडकेत बसचा पुढील भाग चक्काचूर झाला. अपघातात एसटी चालक आणि एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. (Death)


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली. जखमी झालेल्या सुमारे 10 प्रवाशांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Solapur Accident News)



या अपघातामुळे सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून, अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा पुढील तपास सुरू आहे. (Truck Accident)

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील

Four-year-old Aarohi :आईपासून दुरावलेली चार वर्षीय आरोही पोलिसांच्या प्रयत्नांनी सुखरूप घरी

लातूर : देवणी येथील आठवडी बाजारात आईपासून दुरावलेल्या अवघ्या चार वर्षीय आरोहीचा देवणी पोलिसांनी अवघ्या चार

Mumbai-Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गावरील कार अपघातात एका महिलेचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर इन्सुली येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका कारचा भीषण

Pratap Sarnaik : व्यवहारिक मराठी न येणाऱ्या १,२६८ चालकांना नोटिस; महिनाभरात मराठी शिका, अन्यथा बॅज निलंबित

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी

FDA Raid : पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित तर १९.९० लाखांचे खाद्यपदार्थ जप्त!

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने १७ ते २० ऑगस्ट दरम्यान पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली

Mumbai Local : किरकोळ वाद झाला अन् प्रवाशाला चक्क धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिलं

मुंबई : चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या डब्यातून