वसंत डावखरे प्रकरणात कल्याण कोर्टाने बजावले समन्स
मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एका जुन्या खटल्याप्रकरणी कल्याण (Kalyan) न्यायालयाने समन्स बजावले आहे. कल्याण लोकसभेच्या २००९ मधील निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तत्कालीन उमेदवार दिवंगत वसंत डावखरे यांच्याविरोधात वादग्रस्त व्हिडिओ (Video) दाखवून बदनामी केल्याच्या आरोपावरून हे समन्स जारी करण्यात आले असून, येत्या ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश ठाकरेंना देण्यात आले आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे विरुद्ध शिवसेनेचे आनंद परांजपे अशी मुख्य लढत होती. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील (Dombivli) सभेत एक व्हिडिओ सार्वजनिकरीत्या दाखवला होता. या व्हिडिओमध्ये (Video वसंत डावखरे हे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता काम करण्याचे आवाहन करताना दाखवण्यात आले होते.
धाराशिव : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. धाराशिव रोडवरील आळणी पाटीजवळ भरधाव कंटेनरने ...
हा व्हिडिओ निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने सोयीस्करपणे संपादित (मॉर्फ) करण्यात आल्याचा दावा करत वसंत डावखरे यांनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आता कल्याण न्यायालयाने उद्धव ठाकरेंना समन्स बजावून ५ ऑगस्टला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यातील मुख्य तक्रारदार वसंत डावखरे यांचे निधन झालेले आहे. त्यामुळे या प्रकरणात आगामी सुनावणीदरम्यान ठाकरे कुटुंबीय किंवा डावखरे कुटुंबीय कोणती कायदेशीर भूमिका घेतात आणि उद्धव ठाकरे स्वतः कोर्टात उपस्थित राहतात की वकिलांमार्फत बाजू मांडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






