Road Accident : गुरुपौर्णिमेच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला! शिर्डीहून येणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; २ ठार, २३ जण जखमी

धाराशिव : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. धाराशिव रोडवरील आळणी पाटीजवळ भरधाव कंटेनरने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून २२ ते २३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Road Accident)


मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील नारगवाळी, बोरी आणि मातोळा येथील भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते पिकअप वाहनातून आपल्या गावी परतत असताना धाराशिव रोडवरील टोलनाक्यापुढे आळणी पाटीजवळ हा भीषण अपघात घडला.



">प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने पिकअप व्हॅनला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअपचे केबिन आणि मागील ट्रॉली वेगळी होऊन रस्त्यावर विखुरली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि जखमींच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला. (Road Accident)


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन मदत पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तात्काळ बाहेर काढून धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांकडून सर्व जखमींवर उपचार सुरू असून गंभीर जखमींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. (Road Accident)



या अपघातात वाहनातील महिला भाविकांनाही दुखापत झाली असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच अपघाताचे नेमके कारण काय, कंटेनर चालकाचा वेग, निष्काळजीपणा किंवा इतर कोणते कारण याचा तपास पोलीस करत आहेत. गुरुपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी साईबाबांचे दर्शन घेऊन आनंदाने परतणाऱ्या भाविकांवर अचानक ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Road Accident)

Tags
maharashtraroad accidentmaharshtra newsGuru Purnima darshanpickup vehicleshirdi accident
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :