Rajkot Accident : राजकोटमध्ये भरधाव रिक्षाने वृद्ध महिलेला दिली जाेरदार धडक, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

राजकोट : गुजरात मधील राजकोट येथील १५० फीट रिंग रोडवरील आंबेडकर चौकाजवळ एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध महिलेला भरधाव वेगात येणाऱ्या ऑटो-रिक्षाने जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, वृद्ध महिला हवेत उडून रस्त्यावर दूर फेकली गेली. या संपूर्ण अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरार तेथील एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला रस्ता ओलांडत असताना रिक्षाचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडला. धडक इतकी तीव्र होती की, रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेसोबतच रिक्षाच्या आत बसलेला एक प्रवासीसुद्धा हवेत उडून थेट रस्त्यावर आदळला. अपघाताचा हा भीषण देखावा पाहून परिसरातील उपस्थितांमध्ये मोठी धावपळ आणि खळबळ उडाली.



या अपघातात वृद्ध महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे. घटनेनंतर लगेचच स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी मदतीसाठी धाव घेतली. अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या या महिलेला तातडीने उपचारासाठी जवळच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

STF arrests ISI-linked : आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी नागरिकाच्या तिसऱ्या स्थानिक साथीदाराला बंगाल एसटीएफकडून अटक

कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्यदलाने (एसटीएफ) पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

श्रीनगर : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर

India Grasslands Guide 2026 : भारताने सादर केली UNCCD COP17 मध्ये गवताळ प्रदेश आणि खुल्या परिसंस्थांवरील पहिली सर्वसमावेशक मार्गदर्शिका

India Grasslands Guide 2026 : भारताने १७ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक अधिवेशनाच्या (UNCCD) १७ व्या परिषदेत (COP17)

Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस

Khandwa viral news : "नसबंदी करूनही मी ६ पिलांचा बाप झालो!"; खंडव्यात कुत्र्याचा मुखवटा घालून जनसुनावणीत राडा, अधिकारी अवाक

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आयोजित जनसुनावणीदरम्यान एक अत्यंत

Bengaluru Traffic Viral Post : बंगळुरुच्या ट्रॅफिकमुळे सकाळी १० वाजता ऑफिस रिकामं; स्टार्टअप संस्थापकाची उद्विग्न पोस्ट व्हायरल

बंगळुरु : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु (Bengluru) शहरातील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांच्या