Bengaluru News : बेंगळुरू हादरले! मुलीच्या पगारावर डोळा अन् लग्नासाठी ४० लाखांचा हट्ट; विरोध करताच वडिलांनी कॉलेजमध्येच...

बेंगळुरू : आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन करिअरमध्ये यशस्वी व्हावे आणि आनंदाने संसार थाटावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. परंतु, बेंगळुरूमध्ये कौटुंबिक वादातून एका बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर कॉलेजच्या आवारातच सुऱ्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमी झालेली मुलगी एका खाजगी कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) म्हणून कार्यरत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी बेंगळुरूमधील एका खाजगी कॉलेजमध्ये लक्ष्मी दुर्गा नावाच्या प्राध्यापकेवर तिच्या वडिलांनी, म्हणजेच नागेंद्र याने चाकूने वार केले. या हल्ल्यात लक्ष्मी दुर्गा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास घडली. आरोपी नागेंद्र हा आपल्या मुलीला भेटण्याच्या बहाण्याने कॉलेजमध्ये आला होता. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला विभागप्रमुखांच्या (HoD) केबिनमध्ये जाण्याची परवानगी दिली, जिथे लक्ष्मी दुर्गा उपस्थित होती. केबिनमध्ये प्रवेश करताच नागेंद्रने त्याच्यासोबत आणलेल्या सुऱ्याने लक्ष्मी दुर्गावर अचानक हल्ला चढवला. तिच्या पोटात, छातीवर आणि मानेवर अनेक वार करून तो तिथून पसार झाला. या रक्तबंबाळ अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असा खुलासा झाला आहे की, हा जीवघेणा हल्ला एका जुन्या कौटुंबिक वादातून झाला आहे.



आरोपी नागेंद्र हा व्यवसायने कॅब चालक आहे. तो गेल्या काही दिवसांपासून मुलीसाठी मुलगा शोधत होता. एका स्थळाशी बोलणे पक्के झाल्यानंतर नागेंद्रने मुलाच्या घरच्यांकडे तब्बल ४० लाख रुपयांची मागणी केली. "मी मुलीच्या शिक्षणावर आणि करिअरवर खूप मोठा खर्च केला आहे," असा दावा करत त्याने या पैशांचा हट्ट धरला होता. एवढ्यावरच न थांबता, नागेंद्रने लक्ष्मी दुर्गाचा महिन्याचा पूर्ण पगारही त्याच्याच हातात द्यावा, अशी अट घातली होती. वडिलांच्या या अयोग्य मागण्यांना आणि हट्टाला लक्ष्मी दुर्गा आणि तिच्या आईने कडाडून विरोध केला. याच मुद्द्यावरून घरात वारंवार भांडणे होत होती आणि कुटुंबातील संबंध पार बिघडले होते. याच रागातून अखेर बापाने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी नागेंद्रला अटक केली आहे. त्याच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

STF arrests ISI-linked : आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी नागरिकाच्या तिसऱ्या स्थानिक साथीदाराला बंगाल एसटीएफकडून अटक

कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्यदलाने (एसटीएफ) पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

श्रीनगर : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर

India Grasslands Guide 2026 : भारताने सादर केली UNCCD COP17 मध्ये गवताळ प्रदेश आणि खुल्या परिसंस्थांवरील पहिली सर्वसमावेशक मार्गदर्शिका

India Grasslands Guide 2026 : भारताने १७ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक अधिवेशनाच्या (UNCCD) १७ व्या परिषदेत (COP17)

Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस

Khandwa viral news : "नसबंदी करूनही मी ६ पिलांचा बाप झालो!"; खंडव्यात कुत्र्याचा मुखवटा घालून जनसुनावणीत राडा, अधिकारी अवाक

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आयोजित जनसुनावणीदरम्यान एक अत्यंत

Bengaluru Traffic Viral Post : बंगळुरुच्या ट्रॅफिकमुळे सकाळी १० वाजता ऑफिस रिकामं; स्टार्टअप संस्थापकाची उद्विग्न पोस्ट व्हायरल

बंगळुरु : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु (Bengluru) शहरातील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांच्या