Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यातील 'या' भागात उद्या मुसळधार बरसणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

Nashik Rain Update : भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी (दि.३१) नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात म्हणजेच सिन्नर (Sinnar), इगतपुरी (Igatpuri) व त्रंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन पूर्णपणे 'अलर्ट मोड'वर आले आहे. संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी सर्व विभागांनी युद्धपातळीवर तयारी करावी असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. (Nashik Rain Update)



संबंधित विभागांनी २४ तास सतर्क रहावे


आदेश देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांनी सांगितले की, मुक्त पाणलोट क्षेत्रातून येणारा अतिरिक्त पाऊस सुरक्षितपणे सामावून घेण्यासाठी सर्व धरणांमध्ये आवश्यक बफर साठा राखावा, तसेच पाणीसाठ्याचे तासागणिक निरीक्षण करून विसर्गाचे नियोजन वेळेत करावे. नदी-नाल्यांवरील कमी उंचीचे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित विभागांनी २४ तास सतर्क राहावे. (Nashik Rain Update)


गरज भासल्यास वाहतूक तातडीने बंद करून पर्यायी व्यवस्था करावी, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडणार नाही. शहर आणि ग्रामीण भागातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना (Local self-government bodies) पावसाळी नाले, गटारे आणि सांडपाणी वाहिन्यांमधील प्लास्टिक व इतर अडथळे तातडीने हटविण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितील तात्काळ प्रतिसाद देण्यास तयार राहावे, असेही त्यांनी बजावले. (Nashik Rain Update)



गरोदर महिलांना रुग्णालयात हलवण्याचे निर्देश


मुसळधार पावसाच्या अंदाजानंतर आरोग्य विभागालाही विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ४ ऑगस्टपूर्वी प्रसूती अपेक्षित असलेल्या सर्व गरोदर महिलांची (Pregnant Women) माहिती गोळा करून त्यांना पूर्वनियोजनानुसार शासकीय किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयात दाखल करण्या कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींमधील नागरिकांना त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे, तसेच दरडप्रवण आणि संवेदनशील भागांवर सातत्याने नज ठेवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहे.



नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये


सध्या घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, अलीकडे जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांच्चर पार्श्वभूमीवर प्रत्येकाने अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान