Earthquake in Nashik : नाशिकमध्ये भूकंपानंतर प्रशासन अलर्ट; धरणे, पूल, शासकीय इमारतींच्या तपासणीचे निर्देश

Earthquake in Nashik : नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांत मागील काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहे. यामध्ये प्रामुख्याने सुरगाणा, दिंडोरी, पेठ आणि कळवण तालुक्यांचा समावेश आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (District Disaster Management Authority) या भागातील धरणे, तलाव, मोठे पूल, शासकीय इमारती आदींची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.




नाशिकमध्ये भूकंपानंतर अलर्ट


सुरगाणा, दिंडोरी, पेठ व कळवण तालुक्यांतील काही भागांत मागील चार दिवसांत २ ते ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (National Center for Seismology) आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) (Maharashtra Engineering Research Institute (MERI)) भूकंपमापन केंद्रात त्याची नोंद झाली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (District Disaster Management Authority) महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षितता तपासण्याची गरज व्यक्त केली आहे.




धरणे, पूल, शासकीय इमारतींची तपासणी


दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवलेल्या सुरगाणा (Surgana) , दिंडोरी (Dindori) , पेठ (Peth) , कळवण (Kalwan) व त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) या पाच तालुक्यांतील सर्व धरणे, तलाव, मोठे पूल, शासकीय विश्रामगृहे, वसतिगृहे, समाजमंदिरे, शासकीय इमारती आणि शाळांची तातडीने पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणत्याही धरणाच्या भिंतीला, सांडव्याला किंवा पुलाला तडे गेले आहेत का, पाण्याची गळती वाढली आहे का, खचणे किंवा इतर कोणतीही संरचनात्मक हानी झाली आहे का, याची तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत. तपासणीअंती संभाव्य धोका आढळल्यास तातडीने आवश्यक ती प्रतिबंधात्मक व दुरुस्तीची कार्यवाही हाती घ्यावी, असेही देखील सूचित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान