Mumbai News : पास्तात निघाले झुरळ! लोअर परळमधील लोकप्रिय प्ले झोनमध्ये खळबळ; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील एका लोकप्रिय मुलांच्या प्ले झोनमध्ये दिलेल्या पास्तामध्ये झुरळ आढळल्याचा गंभीर आरोप एका वृत्तवाहिनीतील महिला पत्रकाराने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आस्थापनाविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांच्याकडे केली आहे. (Mumbai News)


एनडीटीव्ही प्रॉफिटमध्ये ब्युरो चीफ म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमी चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत दावा केला की, त्यांच्या मुलांनी पास्ता खाल्ल्यानंतर त्यातील एका सर्व्हिंगमध्ये झुरळ आढळले. तसेच बसण्याच्या जागेवरही अनेक  मेलेली झुरळे दिसल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. (Lower Parel News)



पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "आमच्या मुलांनी पास्ता खाल्ल्यानंतर त्यात झुरळ आढळले.  त्यांनी या परिस्थितीला “पूर्णपणे अस्वीकार्य” म्हटले असून, मुलांचे आरोग्य धोक्यात आणल्याचा आरोपही केला आहे. (Crockroach in Pasta)


मात्र, या आरोपांची अधिकृत पातळीवर अद्याप पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी होईपर्यंत हे दावे केवळ सोशल मीडियावरील आरोप म्हणूनच पाहिले जात आहेत. चौकशीनंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.






राज्यभरात सुरु आहेत मोहीम


महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) राज्यभरात अन्न सुरक्षा मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत, तपासणीत जिवंत झुरळे, माश्या, अस्वच्छता आणि अन्नाची अयोग्य साठवणूक उघडकीस आल्यानंतर, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अलीकडेच मुंबईतील अनेक नामांकित रेस्टॉरंट्स आणि क्लब किचनचे परवाने निलंबित केले आहेत.

Comments
Add Comment

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले