Jalgaon Crime : शेतजमिनीची अधिकृत मोजणी करून देण्यासाठी तब्बल ७१ हजार ७०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगावमधील भूमिअभिलेख विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात (Jalgaon Taluka Police Station) दोन्ही संशयितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आता असून या कारवाईमुळे भूमिअभिलेख विभागात (Land Records Department) एकच खळबळ उडाली आहे.
२२ व्या मजल्यावर जागा; २३ व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे भव्य कार्यालय मुंबई : मंत्रालयातील गर्दी आणि जागेची टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने ...
नेमकं प्रकरण काय ?
या प्रकरणातील संशयित राहुल ताराचंद कोळी (Rahul Tarachand Koli ) हे भूमिअभिलेख विभागात भूकरमापक म्हणून कार्यरत असून, कल्पेश सोमनाथ पाटील (Kalpesh Somnath Patil) हा कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर आहे. तक्रारदार शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या गट हिस्सा आणि पोटहिस्स्याच्या अधिकृत मोजणीसाठी नियमानुसार अर्ज करून शासकीय शुल्कही भरले होते. मात्र, काम पूर्ण करून देण्यासाठी भूकरमापक राहुल कोळी यांनी सुमारे ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
कोल्हापूर : अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते, पण याच अन्नाच्या नावाने नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ खेळणारा एक अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार ...
सापळा रचत कारवाई
दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने १७ जुलै रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबत लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर एसीबीने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत भूकरमापक कोळी यांनी मोजणीच्या दिवशी व्यवहार करण्याचे सांगितल्याची नोंद करण्यात आली. याचदरम्यान कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर कल्पेश पाटील याने नोटीस पाठविण्यासाठी मुद्रांक शुल्काच्या नावाखाली ६२५ रुपये अतिरिक्त रक्कम मागितल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे एसीबीने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचण्याचा निर्णय घेतला.
मुंबई: मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाढती गर्दी आणि प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
भूमिअभिलेखचे दोन कर्मचारी जाळ्यात
ठरल्याप्रमाणे संशयितांनी शेताची मोजणी पूर्ण केल्यानंतर तक्रारदाराला करंज येथील बसस्थानकाजवळ बोलावले. तेथे ७० हजार रुपयांसह नोटीस आणि खासगी मदतनीसाच्या खर्चाच्या नावाखाली एकूण ७१ हजार ७०० रुपयांची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने कारवाई करत दोन्ही संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात (Jalgaon Taluka Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लाचेच्या मागणीमागील कारणांसह यापूर्वीही अशाच प्रकारे इतरांकडून पैसे उकळण्यात आले होते का, याचाही तपास सुरू आहे.





