Jalgaon Crime : संतापजनक ! बहिणीच्या प्रेमविवाहाचा संताप भावाला अनावर , भावाने थेट...

Jalgaon Crime : बहिणीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या समाजातील तरुणाशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या (Fatehpur Police Station) हद्दीत घडली. या हल्ल्यात प्रशांत चौधरी (२५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (Jalgaon Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत चौधरी आणि संबंधित तरुणी हे वेगवेगळ्या समाजातील असून दोघांमध्ये काही काळापासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांनी सिल्लोड येथे जाऊन प्रेमविवाह केला. विवाहानंतर दोघे एकत्र राहत असताना या नात्याबद्दल मुलीच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी होती. प्रेमविवाहामुळे कुटुंबाची बदनामी झाल्याची भावना मनात ठेवून मुलीचा सख्खा भाऊ अभिषेक मोरे याने प्रशांत चौधरी याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. (Jalgaon Crime News)



मेहुण्याची प्रकृती चिंताजनक


संतापाच्या भरात त्याने मोठा दगड उचलून प्रशांतच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात प्रशांत गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी प्रशांतला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. (Jalgaon Crime News)



संशयित आरोपी ताब्यात


दरम्यान, घटनेनंतर फत्तेपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी अभिषेक मोरे (१९) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात (Fatehpur Police Station) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९(१) अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या समाजातील प्रेमविवाहाच्या विरोधातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हल्ला पूर्वनियोजित होता का, तसेच इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास फत्तेपूर पोलीस करत आहेत. 

Comments
Add Comment

Ahilyadevi Holkar Karj Mukti Yojana : आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ

- राज्य सरकारचा निर्णय; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती' योजनेसाठी मानक कार्यप्रणाली

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Water Ambulance : मुंबई महानगर प्रदेशात सुरू होणार 'वॉटर ॲम्ब्युलन्स'

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; संबंधित विभागांना संयुक्त प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Nashik : छायाचित्रकार दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नाशिकच्या पत्रकार, छायाचित्रकारांसोबत खास क्षण

Nashik : पत्रकारांच्या , छायाचित्रकारांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आज अनोखा प्रसंग घडला. आज जागतिक छायाचित्रण

Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस

Chandrashekhar Bawankule : सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी सुधारित धोरण

- २०१० पासूनची स्थगिती उठणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण